तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरचा टप्पा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा गौरवशाली दिवस म्हणजेच ‘महाराष्ट्र दिन’ आज स्थानिक तहसील कार्यालय हदगाव येथील परिसरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
मुख्य सोहळा आणि ध्वजारोहण
आज सकाळी ठीक 07:00 वाजता तहसीलदार सय्यद उमर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. वंदे मातरम गीत,राष्ट्रगीत, राज्य गीत नंतर उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
तहसीलदारांचे संबोधन
याप्रसंगी बोलताना तहसीलदार म्हणाले की, “महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. राज्याच्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाचा वाटा महत्त्वाचा आहे. प्रशासकीय स्तरावर सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे, हीच खऱ्या अर्थाने राज्याची सेवा ठरेल.या कार्यक्रमाला नायब तहसीलदार अनिल तामसकर, मंडळ अधिकारी तलाठी, व महसूल चे कर्मचारी पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते इतर मान्यवर उपस्थित होते:
कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.






















