Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक (Baramati By Election Result 2026) लागली होती. 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येत आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या निकालाच्या 9 व्या फेरीच्या मतमोजणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना 78 हजार 528 मतांनी आघाडीवर आहे. सुनेत्रा पवारांची ही आघाडी आणखी वाढत जाणार असून विजयही जवळपास निश्चित झाला आहे. यादरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar)
सुनेत्रा पवार पोस्ट करत काय म्हणाल्या? (Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar) आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते, असं उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं.
मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते- सुनेत्रा पवार (Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar) अजितदादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची…असं सुनेत्रा पवार पोस्टद्वारे म्हणाल्या.