नांदेड दि.२७ :नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके मार्फत शहरात होत असलेल्या मान्सुनुपूर्व नालेसफाईच्या अनुषंगाने महापालिकेत दिनांक २७.०५.२०२४ रोजी पावडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सांडपाणी प्रश्ना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह पावडेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बंडु पावडे, गट विकास अधिकारी नारवटे, सहाय्यक संचालक आलुलकर व नगरचनाकार नजरुल इस्लाम, उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता दिलीप आरसुडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, उपअभियंता दिलीप टाकळीकर, नायब तहसिलदार चव्हाण, मंडळ अधिकारी येवते यांची उपस्थिती होती.
बैठकी दरम्यान मौर चौकातील नाल्यात मनपा हद्दीतील व वाडी ग्राम पंचायत क्षेत्राचे सांडपाणी येत असल्याने नाला ओव्हर फ्लो होऊन स्थानिक नागरीकांना रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने यावर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी वाडीचे उपसरपंच बंडु पावडे यांना सुचना केली.
तसेच महानगरपालिका हद्दीतुन नैसर्गिक उताराने पावडेवाडीत जाणारा नाला हा जवळपास १४५० मीटर क्षेत्र प्रवाहीत होऊन परत तो महापालिका हद्दीत श्रावस्ती नगर येथे येत असुन सदरील नाल्याची रुंदी व खोली ही मनपा हद्दीत प्रवाहीत होत असतांना योग्य मानका प्रमाणे आहे. परंतु पावडेवाडीतुन प्रवाहीत होणाऱ्या नाला अतिशय अरुंद झाला असुन त्यावर बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही त्यामुळे वाडी हहीतुन प्रवाहीत होणाऱ्या नाला रुंद करुन त्यावरील अतिक्रमणे काढण्याची सुचना यावेळी आयुक्तांनी केली.
त्याअनुषंगाने पावडेवाडीचे उपसरपंच व गट विकास अधिकारी यांनी वाडीतुन प्रवाहीत होणाऱ्या नाल्याची रुंदी वाढवुन घेऊन अतिक्रमणे काढुन व आवश्यक ती साफसफाई करुन घेऊन तसेच लहान पाईप ऐवजी त्या ठिकाणी मोठे पाईप टाकुन घेऊन नाल्यातील सांडपाणी प्रवाहीत राहील याची दक्षता घेण्याचे आश्वासन बैठकी दरम्यान दिले आहे.
या बैठकी नंतर महापालिका, वाडी ग्रामपंचायत, नगररचना विभाग व तलसिल कार्यालयाच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करुन आवश्यकत्या उपाययोजना करण्यासाठी उद्यापासुनच कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड












