• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, June 17, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

“काँग्रेस का हाथ गरीबोंके साथ” हा विचार जगणारा कार्यकर्ता: संतोषराव आंबेकर

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
9 June 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 2072919567 1717956909872
45
SHARES
300
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.९: स्वातंत्र्य आंदोलनानंतर देशात वाढलेली गरीबी दुर करण्यासाठी गरीबी हटाव चा नारा देत काँग्रेस समाजात काम करत आली. तोच विचार आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात रुजवला. दारिद्र्य रेषेखालील जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या. साक्षरतेचे प्रमाण वाढवून त्यांना रोजगार निर्माण करून दिला. काँग्रेसच्या राजकारणाचा पाया हा समाजकारण आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. हा विचार देशातील कित्येक तरूणांना प्रभावित करत आहे. त्यातीलच एक तरुण हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस चा सक्रिय कार्यकर्ता संतोष आंबेकर. गरीब, वंचित, शेतमजुर यांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी काँग्रेस च्या नेतृत्वात स्वतःला झोकून देऊन काम करताना दिसतोय.
तो अशी भावना व्यक्त कि,
“आम्ही जलमलो माती किती होणार गं माती
खापराच्या दिव्यात या कधी पेटणार वाती”
या कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेच्या ओळी शेतकर्यांच्या दयनीय व केविलवाण्या परिस्थितीचे भयावह चित्र समाजासमोर मांडण्यास अगदी समर्पक आहेत. हे चित्र अत्यंत वेदनादायी असुन माझ्यासारख्या शेतकर्याच्या पोराला विचार करायला लावणारं आहे. किंबहुणा हे बदलण्यासाठी कुणी अवतार घेणार नसुन मला आणि माझ्यासारख्या युवकांना हे चित्र बदलण्यासाठी समोर यावं लागेल. स्वयंस्फुर्तीने हे सामाजिक उत्तरदायित्व स्विकारून सामाजिक, राजकीय चळवळीत सहभागी होऊन समाज परिवर्तनाच्या लढाईत स्वताला झोकुन देऊन, जात-पात, धर्म-पंथ या विषमतावादी जोखडाच्या पलिकडे जाऊन छत्रपती शिवराय, फुले,शाहु,आंबेडकर, महात्मा गांधीजी, आण्णाभाऊ यांच्या विचारांवर समाजपरिवर्तनासाठी झगडणे गरजेचे आहे.
त्यामुळे ते प्रथम लोकस्वराज्य आंदोलन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन सामाजिक चळवळीत सक्रिय झाला. बहुजन, दलित, कष्टकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सदा तत्पर असणारा कार्यकर्ता म्हणुन तालुक्यात ओळख निर्माण केली. अतिशय अल्प काळात मंगरुळ या गावात सर्वच महापुरूषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन आणि त्या निमीत्ताने सामाजिक प्रश्नांवर विचारमंथन आणि त्यातुन मजबुत संघटन बांधणी केली. सर्वांच्या सुखदुखात स्वताची हजेरी लावणारा आणि होईल ती मदत करणारा. कोणी दुर्धर आजाराने ग्रासला असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करून आणि लोकवर्गणीतुन जनतेचे जीव वाचवण्यासाठी झगडणारा लोकसेवक अशी प्रतिमा ज्यांची आहे. सामाजाला मोठ्या प्रमाणात न्याय द्यायचा असेल तर राजनीतिक शक्ती प्राप्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रेकार्ड ब्रेक मते घेऊन ग्रामपंचायत सदस्य म्हणुन नियुक्ति झाली. ग्रामपंचायत सदस्य पदावर असुनही गावातील प्रत्येक समस्याग्रस्त संतोषराव आंबेकर यांनाच भेटणार. आपल्या समस्येचं निराकरण करुण तो गावकरी निघणार. आता तर उपसरपंच पदावर विराजमान होऊन गावाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाण्यासाठी सतत कार्यरत असलेला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तालुक्यात ओळख निर्माण केली आहे. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघ संघाचे कार्यकुशल व कर्तव्यदक्ष आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन हिमायतनगर काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाच्या तालुकाध्यक्ष पदांची जबाबदारी सोपवली. अगदी एका वर्षात त्यांनी पक्षांच्या विचारांना गावागावात पोहोचवण्याचं काम केलं.
खैरगाव-मंगरूळ पुलाचा विषय लावून धरून त्या पुलाचे काम आज पुर्णत्वास जात आहे. गावात बस सुविधा जेव्हा ब़ंद करण्यात आली तेव्हा हदगाव आगाराला आंदोलनाचा इशारा देताच तात्काळ बस सेवा सुरु करण्यात आली. राज्य सरकारने ५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी कडाडून विरोध केला व थेट शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांना निवेदन देऊन तो निर्णय मागे घ्या अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला. तो निर्णय ही सरकारने मागे घेतला. हिमायतनगर शहरात सामाजिक न्याय विभागाने शासकीय वस्तीगृह मंजुर करावे ही मागणी करणारा हिमायतनगर तालुक्यातील एकमेव नेता तो म्हणजे संतोष आंबेकर.
सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय आणि सोसायटीच्या संचालक मंडळावर निवड होऊनही जमिनिशी नाळ जोडून असलेला नेता ज्याच्यातला कार्यकर्ता सदा जिवंत असतो. म्हणुन त्यांच्या सामाजिक व राजकिय लढाईचा अल्पपरिचय समाजातील युवकांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करुन देणे मला गरजेचे आहे असे वाटते. काँग्रेस का हाथ गरीबोंके साथ हा विचार जगणारा तरूण समाजपटलावर येवो.काँग्रेस विचारधारेला अभिप्रेत त्यांचे कार्य निरंतर चालू राहो व समाजातील गरीबी दुर करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या चळवळीला त्यांच्यामुळे बळ प्राप्त होवो हीच अपेक्षा. श्री.अनिल काशिनाथ कांबळे
महानगर कार्याध्यक्ष, नांदेड काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

विमानतळ पोलिस स्टेशन लक्ष्मी नगर भागात ८,२७,००/- रुपायाचा ४१.३५० किलोचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ ग्रहण सोहळ्याचा हिमायतनगर शहरात जल्लोष !👉🏻 एलईडी स्क्रीन लावून शपथविधीचे दाखवले प्रात्यक्षिक….

Next Post
IMG 20240609 WA0045

पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ ग्रहण सोहळ्याचा हिमायतनगर शहरात जल्लोष !👉🏻 एलईडी स्क्रीन लावून शपथविधीचे दाखवले प्रात्यक्षिक….

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • नीट पेपर फुटीसंदर्भात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनाम्यासाठी आम्ही 13 जूनपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नसल्याने आम्ही 20 जूननंतर संपूर्ण देशात शांततेत आंदोलन करणार आहोत. ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय मागे घेतले जाणार नाही. आमची नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी याची दखल घ्यावी. माझ्यावर झालेला हल्ला हे देशातील बेरोजगारीचे उत्तम उदाहरण आहे. देशाच्या विद्यमान परिस्थितीला भाजप इतकीच काँग्रेस पण जबाबदार आहे.
- अभिजीत दिपके, संस्थापक (कॉक्रोच जनता पार्टी)
#AbhijitDipke #MarathiNews #LatestNews #SatyaprabhaNews
  • तुमच्या मते लग्नाआधी कोणता प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇
#MarriageTips #SatyaprabhaNews  #RelationshipGoals #MarathiPost #LifePartner HealthyRelationships
  • NEET परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी सरकारने Telegram वर २२ जूनपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेतील निष्पक्षता टिकवणे, अफवा आणि बनावट माहितीवर नियंत्रण ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे.
विद्यार्थ्यांनी कृपया फक्त अधिकृत संकेतस्थळे आणि विश्वसनीय स्रोतांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जागरूक रहा, सुरक्षित रहा.
.
#NEET #TelegramBan #EducationNews #ExamTransparency #StudentSafety GovernmentDecision NEET2025 SatyaprabhaNews
  • ज्याला जायचं आहे, त्याने खुशाल जावं. त्यांचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आज माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल.
.
#UddhavThackeray #MarathiNews #SatyaprabhaNews #BreakingNews
  • काही लोक अंधभक्त असतात, पण आमच्या खासदारांवर आमचा अंधविश्वास आहे. - आदित्य ठाकरे, नेते, शिवसेना ठाकरे गट
.
#marathinews #maharashtranews #SatyaprabhaNews #BreakingNews #adityathackry
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगितनांदेड, दि. १५ जुन : महापालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या प्रलंबित 5 टक्के राखीव निधीसह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने सोमवारी नांदेड-वाघाळा महापालिकेत धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो दिव्यांगांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या मांडून प्रशासनाकडे जाब विचारला.सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनात दिव्यांगांच्या खात्यात निधी जमा करणे, दिव्यांग विभागासाठी स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उपलब्ध करून देणे, अपुरे कर्मचारी वाढविणे, स्वयंरोजगारासाठी गाळे व जागा उपलब्ध करून देणे, घरकुल, पार्किंग ठेके तसेच शासकीय अनुशेष भरणे आदी मागण्यांवर प्रशासनाशी सविस्तर चर्चा झाली....http://www.satyaprabhanews.com/commissioner-dalnasmore-divyangancha-thiyya-agitation-suspended-after-assurance-from-administration/12690/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंना मारहाण, राजस्थानमधील जयपूरमध्ये आंदोलनावेळी घडली घटना#CJP #AbhijeetDipke #SatyaprabhaNews #cockroachjanataparty #jaipur BreakingNews
  • ब्रिटनसारखं भारतातही १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मिडियावर बंदी घालायला पाहिजे का?
कमेंटमध्ये व्यक्त व्हा..
#socialmedia #instagram #SatyaprabhaNews  #facebook #snapchat youth teenagers teenagerslife socialmediaban
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज

15 June 2026
IMG 20260611 215403

हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिके दाखवत केल्या विविध सूचना…

11 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026
IMG 20260615 WA0251

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा सत्कार व पुस्तके वाटप….

15 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज