शनिवारी सकाळी कामगार कल्याण मंडळात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे कौशल्य विकास विभागाकडून आवाहन
नांदेड दि. १३ : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत नांदेड येथे कामगार कल्याण मंडळाच्या ललित कला भवन आयटीआय शेजारील भवनात शनिवार 15 जून रोजी ,सकाळी दहा ते दोन या काळात मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे . या मार्गदर्शन शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अतिशय महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक असणाऱ्या या छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरात पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याच्या आवाहन करण्यात आले आहे.दहावी व बारावी नंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम महाविद्यालयीन अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना, माहिती करिअर प्रदर्शनीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवता यावे यासाठीच्या आवश्यक बाबी यावेळी तज्ञांकडून सांगितल्या जाणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.या शिबिराला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य एस.व्ही.सूर्यवंशी यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













