कोठा तांडा येथील अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान.
तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून देण्याची मागणी.
हिमायतनगर ता.प्र नागेश शिंदे दि.१: तालुक्यातील मौजे कोठा तांडा, धानोरा ज, शिरंजनी, वडगाव , घारापुर, दिघी सह आदी ठिकाणी काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ह्या गावचा हिमायतनगर शहराशी संपर्क तुटला आहे तर शहरातील मुख्य वस्तीमध्ये पाणी शिरल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे.काल दि ३१ ऑगस्ट च्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हिमायतनगर शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये पाणी शिरले तर अनेक नदी नाल्यांना पुराच्या वेड्याने घेराव घातल्याचे विदारक चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे हिमायतनगर शहरातील महसूल प्रशासनाकडून नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की पाण्याची पातळी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काम करा,विनाकारण पाण्यामध्ये कोणीही शिरू नये व पुलावरून पाणी जात असेल तर मोटरसायकल वाहने त्यात टाकू नये अशा सूचना तहसील प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि ३१ ऑगस्ट च्या मध्य रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदी सह असंख्य छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना पाण्याच्या वेड्याने घेरले आहे त्यामध्ये असंख्य शेतकऱ्यांचे जन जीवन या पाऊसाच्या पाण्याने विस्कळीत झाले आहे तालुक्यातील पळसपुर ,घारापूर, दिघी, कोठा तांडा, सह धानोरा ज.या गावातील लहान-मोठे नदी नाले खळखळून वाहत आहेत तर काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत नागरिकांनी पाण्यात न उतरण्याचा व पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यातून वाहन न चालविण्याचे आव्हान महसूल प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे हिमायतनगर शहराला पाण्याच्या वेढ्याने घेरले त्यामुळे हिमायतनगर महसूल प्रशासन व नगर पंचायत प्रशासनाने तात्काळ शहरात रेस्क्यू ऑपरेशन राबवून हिमायतनगर शहरातच्या मुख्य वसाहतीमध्ये पाणी शिरण्या अगोदरच छोट्या-मोठ्या नदी नाल्यामध्ये अडकलेला घाण कैर कचरा जे.सी बी. च्या साह्याने मोकळा करून या नाल्यांना वाट करून देण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे शहरातील कनकेश्वर तलाव परिसरामधील कोरड्याचा मळ्यात व नेहरूनगर लोक वस्ती मध्ये पाणी शिरल्याने तेथील कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे ह्या बाबी कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नाल्यामध्ये अडकलेली घाण जेसीबीच्या साह्याने मोकळी करून कनकेश्वर तलाव परिसरातील नागरिकांची गैरसोय तात्काळ दूर करावी व आपातकालीन परिस्थितीमध्ये तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे काळजी घ्यावी अशी मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे
चौकट
कोठा तांडा येथील अर्धवट फुलाच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
” हिमायतनगर तालुक्यातील कोठा तांडा येथील अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे असंख्य शेतकऱ्यांच्या शेतातील पीक या मुसळधार पावसाने खरडून गेल्यामुळे तो शेतकरी एन मोसमांमध्ये संकटात सापडला आहे त्यामुळे शासनाने याचे तात्काळ दखल घेऊन सबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी येथील शेतकरी बाळाराम गोपा राठोड, प्रमोद राठोड सह आदी जणांनी केली आहे “
चौकट
“तालुक्यातील धानोरा ज या गावांमध्ये मागील वीस वर्षांपासून यावर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने परिसरातील नदी नाल्यांना पुराचे स्वरूप निर्माण झाले आहे तर असंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून त्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे ह्याचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी येथील सरपंच प्र.गणेश शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे”
#सत्यप्रभा न्युज #नांदेड