लातूर येथील रिक्षा चालक भिमराव गायकवाड यांनी रिक्षात विसरलेली महिला प्रवाशाची चार लाख रुपये किमतीच्या मौल्यवान दागिन्यांची पर्स महिला प्रवाशास जशीच्या तशी परत केल्या बद्दल प्रामाणिक रिक्षा चालक भिमराव गायकवाड यांचा खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या हस्ते सत्कार
विजय पाटील लातुर प्रतिनिधी दि.१०: लातूर शहरात रिक्षातुन प्रवास करून रिक्षातून उतरताना रिक्षामधेच सिटच्या पाठीमागे विसरून राहिलेली चार लाख रुपये किमतीच्या मौल्यवान दागिन्यांची महिला प्रवाशाची पर्स जशीच्या तशी लातूर गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक करे साहेब यांच्या हस्ते त्या महिला प्रवाशांना परत साभार करण्यात आली,
या प्रामाणिक पणाबद्दल रिक्षा चालक भिमराव गायकवाड यांचा लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या हस्ते ओमकार गणेश मंडळाच्या आरती वेळी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला भिमराव गायकवाड हे लातूर शहरात १९७९ पासून रिक्षा व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात,
ते गेली ४५ वर्षे रिक्षा व्यवसायात आहेत, वयस्कर असुनही ते रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाला आधार देतात.याप्रसंगी बोलताना खासदार डॉ शिवाजी काळगे म्हणाले की अशा प्रामाणिक रिक्षा चालकाचा मला अभिमान आहे, प्रवाशांनीही रिक्षातुन प्रवास करून ऊतरतेवेळी आपण काही रिक्षात विसरलो आहे काय याचीही आठवण करणे महत्त्वाचे असते, कारण तो रिक्षा चालक सिटच्या पाठीमागे दर वेळी बघत नसतो व दुसरा प्रवासी घेऊन तो अनेक भाडे करत आसतो, अशावेळी दुसऱ्या प्रवास करणाऱ्या व्यक्तींने जर ती पर्स नेली असती तर त्या रिक्षा चालकाचा काय दोष आसतो,अशा वेळी नाहक चौकशीचा त्रास त्या रिक्षा चालकाला होऊ शकतो. म्हणून प्रवाशांनीही आपल्या सामानाची जबाबदारी स्व:ताच सांभाळणे महत्त्वाचे असते,
सत्यप्रभा न्यूज #लातूर