लातूर प्रतिनिधी विजय पाटील दि १८: संजय बनसोडे यांच्या ‘उदगीर- जळकोट’ मध्ये राष्ट्रवादीची यंदा डोकेदुखी; उदगीरची बदलती समीकरणे कुणाच्या पथ्यावर ?
मिळत आहे. संजय बनसोडेंच्या कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न होताना दिसत आहेत. अर्थात तत्कालीन भाजपा नेते सुधाकर भालेराव, डॉ. अनिल कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे परंतु, महायुतीतील घटक पक्षांचे काही नेते संजय बनसोडे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करून त्यांना आव्हान देऊ लागले आहेत. संजय बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवरून
महायुतीतील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये नापसंतीचे वातावरण आहे. मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच संजय बनसोडे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गावोगाव जाऊन बाहेरचा उमेदवार नको असा प्रचार सुरू केला आहे. भेटीगाठी घेत संवाद साधत आहेत. शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभेचे
पडघम वाजू लागले आहे. महायुतीतील घटक पक्षातून काहीजण बाहेर पडले तर काहींनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती बळ देतात यावर बनसोडे यांच्या विरोधातील वातावरण अवलंबून राहणार आहे.
उदगीर मतदार संघात निवडून येण्याच्याही आधीपासून संजय बनसोडे यांचे मतदार संघात आपले नेतृत्व प्रस्थापित
करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
त्यासाठी त्यांनी सातत्याने या ना त्या कारणावरून मतदारसंघात गाठीभेटी घेण्याचा दौरा केला. विधानसभेच्या विजयानंतर संजय बनसोडे यांनी सर्वपक्षीय अनेक पदाधिकारी आपल्याकडे वळवले. असे असतानाही कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न होताना दिसत आहे. मात्र अद्याप उदगीर विधानसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण? हे निश्चित झालेले नाही.
# सत्यप्रभा न्यूज # लातूर













