नांदेड दि.३: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबा नगर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील चित्रकला स्पर्धेसाठी लाॅयन्स क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यामार्फत ड्रॉइंग पेपर , ब्रश व रंगपेटी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली .स्पर्धेत ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वर्ग निहाय विषय ठरवून देऊन भव्य स्वरुपात चित्र कला स्पर्धा घेतली. सदरील चित्रकला स्पर्धेतून प्रत्येक तुकडीतून प्रथम द्वितीय असे बक्षीस देण्यात आले. सदरील चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मारोतराव कल्याणकर व पर्यवेक्षिका सौ . एस. टी. पावडे यांनी परवानगी दिली. सदरील कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव डॉ. श्री रावसाहेब शेंदारकर साहेब
लायन्स क्लब चे रिजनल चेअर पर्सन रवीजी कडगे, डिस्टिक पोस्टर योगेशजी जैस्वाल, झोनल चेअर पर्सन शिवकांतजी शिंदे, लॉयन्स क्लब सेंट्रल चे अध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव गौरव दंडवते, खजिनदार दीपेश छेडा, क्लब सदस्य ॲड.उमेश मेघदे,सुबोध बोंबीलवार ,अमित वाघमारे,संजय दासे, प्रवीण जोशी ॲड.ओमप्रकाश कामींनवार, उपस्थित होते. सदरील स्पर्धा यशस्वी करण्याकरता शाळेतील कलाध्यापक श्री कैलास राखेवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













