• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 29, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

प्रत्येक अपघात टाळला जाऊ शकतो : अभिजीत राऊत

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 January 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 1495075178 1735917598336
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

राज्य रस्ता सुरक्षा अभियानास नांदेड जिल्हयात सुरुवात

नांदेड़  दि.३  : निष्णात फलंदाज सचिन तेंडुलकर फिरकी गोलंदाजीवरही हेल्मेट घालून का खेळतो ?याचे उत्तर ज्याला कळले त्याला रस्तासुरक्षेचे मर्म कळले.त्यामुळे रस्त्यावर अतिआत्मविश्वास न दाखवणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, हेल्मेट लावणे, सीट बेल्ट लावणे, मोबाईल न वापरणे,फुटपाथवर पायी चालताना कायम रस्त्याच्या उजव्या बाजूला वाहनांकडे तोंड करून चालणे, महत्त्वाचे ठरते. असे केल्यास प्रत्येक अपघात टाळल्या जाऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज केले.

१ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियान २०२५ राबविण्यात येणार असून, त्याकरिता ‘पर्वा ‘ अर्थात इंग्रजी मधील केअर ही थीम घोषीत करण्यात आली आहे. सदर अभियानाचे उद्घाटन ०३ जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रथम दिपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून.अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड, डॉ. महेश कुमार डोईफोडे, आयुक्त, नांदेड-वाघाळा मनपा, श्रीमती दलजितकौर जज, सचिव नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, .बि.सी.पांढरे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड इतर शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात संदिप निमसे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का), नांदेड यांनी रस्ता सुरक्षा अभियाना मागचा उद्देश व विभागाची भूमिका मांडली. विभागातर्फे राबविण्यात येणा-या अंमलबजावणी (Enforsment) मुळे व भविष्यातील तंत्रज्ञानाने अपघात कमी करण्याबाबत तसेच सदर अभियान अंतर्गत पूर्ण महिनाभर परिवहन विभाग विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी यांनी उपिस्थतांना वाढते अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पायी चालणाऱ्यांनी कायम रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे अर्थात फूटपात वरून वाहनाकडे तोंड करून पायी चालण्याची पद्धत अवलंबावी (Walk on Right ) या बाबीचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले. ओव्हर कॉन्फीडन्स मध्ये वाहन चालविणे, मोबाईल टॉकीग, तसेच छोटया छोटया चुकामुळे अपघात होत असल्यामुळे त्या चुका होऊ न दिल्यास अपघात थांबतील. वाहनांना, सायकली, बैलगाडींना रिफलेक्टर लावण्यानंतरच वाहने चालविण्याबाबत सुचना दिल्या. तसेच सहा साखर कारखान्यांमध्ये वाहतूक करताना वाहतूकदारांनी रिफ्लेक्टर लावूनच उसाची वाहतूक करण्याचे आवाहन केले. या वर्षाच्या ‘पर्वा ‘ संकल्पनेची थिम असल्याबाबत सांगितले. रस्ता सुरक्षा समिती सर्व यंत्रणा सदर अभियान जिल्हाभर राबवून अपघात मुक्त नांदेड करण्याचे संकल्पना मांडण्यात आली.श्रीमती दलजितकौर जज, यांनी रस्ता सुरक्षा करिता वाहतुक नियमांचे पालन करणे व दूचाकी चालविताना हेल्मेटचे वापर करण्याबाबतचे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी.पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते आपल्या प्रिय व्यक्तीकरिता Parwah – care (संदेश फलकाचे) रस्ता सुरक्षा कार्यक्रमाच्या वेळी उदघाटन करण्यात आले.उपस्थितांना वाहतूक चिन्हे, रस्ता सुरक्षा चिन्हे याबाबत अधिकारी यांनी प्रत्यक्ष व भिंती पत्रकाद्वारे रांगोळी द्वारे मार्गदर्शन केले तसेच प्रथमोपचार व अपघातांनंतर घ्यावयाची काळजी बाबत डॉ. कुलकर्णी, डॉ. गुटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती रेणुका राठोड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती अनुराधा पतकी यांनी केले. या प्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी, तसेच सुमारे २०० एनसीसी कैडेट, वाहन वितरक प्रतिनिधी फरांदे, श्री. कोठारी, जाधव, . राठी, मोटार वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष . हुंदल, तसेच ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष . नरेंद्र गायकवाड, अहेमद बाबा, स्कुलबस संघटनाचे अध्यक्ष निखिल लातूरकर, . मनाळकर मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक . जयवंत पवळे, .धुळे, मस्के व जनसमुदाय उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी . समीर शेख, प्रशांत कंकरेज, मोटार वाहन निरिक्षक . अनुश्री केंद्रे, किशोर भोसले, . राघवेंद्र पाटील, गणेश तपकिरे कार्यालयातील सर्व सहा. मोटार वाहन निरिक्षक, कर्मचारी गजानन शिंदे व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोरोना आजारापेक्षा अपघातात मृत्यूमुखी


कोरोना आजारापेक्षा अपघातात मृत्यूमुखी

श्रीमती दलजितकौर जज यांनी देशातील अपघातात मृत्यु पडलेल्या व्यक्तीची संख्या पाहिली असता ती संख्या ही मागिल काही कालावधीमध्ये कोरोना या महाभयंकर बिमारीपेक्षाही अधिक असल्यामुळे रस्त्यावर वाहन चालवितांना सर्वानी वाहतूक नियमाचे पालन करुन वाहने चालविण्याबाबत सुचना दिल्या.

नांदेडमध्ये वर्षभरात ३९४ अपघाती मृत्यू

जोपर्यंत एखादी घटना आपल्या घरात घडत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य कळत नाही. नांदेड मध्ये गेल्या वर्षभरात झालेल्या अपघाती मृत्यूची संख्या ३९४आहे. आणखी एक ज्यांचा काही दोष नाही अशा पायी चालणाऱ्या ६४ जणांना वाहनांनी चिरडले आहे. ३६५ दिवसात ३९४अधिक ६४ एकूण ४५८ लोकांचा जीव बेदर्कारपणे चालणाऱ्या वाहनांनी एकट्या नांदेड जिल्ह्यात घेतला आहे.

#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

सततच्या वाचनाने यश निश्चितच प्राप्त होते : अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव

Next Post

‘दर्पण ‘कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान

Next Post
image editor output image 730790761 1735918191752

'दर्पण 'कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान

Comments 1

  1. mitolyn official says:
    3 months ago

    **mitolyn official**

    Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अभियंत्यावर चिखल फेकल्याप्रकरणी नितेश राणेंना 1 महिन्याचा कारावास, मात्र तात्काळ शिक्षेला स्थगिती#NiteshRane #maharashtra #MarathiNews #SatyaprabhaNews
  • अजितदादांच्या अपघाताला परवा
तीन महीने होत आहेत मात्र अद्यापही
तपास पुढे सरकलेला नाही,
CID नेमकं काय करतंय हे
देखील कळायला मार्ग नाही! : रोहित पवार#NAjitPawar #SatyaprabhaNews #rohitpawar #bageshwarbaba
  • RSS आणि भाजप जिथे जातात, तिथे द्वेष पसरवतात, धर्माधर्मांत फूट पाडतात आणि लोकांमध्ये भीती निर्माण करतात : राहुल गांधी#rahulgandhi #RSS #BJP #SatyaprabhaNews
  • एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या साधारण महिलेला (ज्योती वाघमारे) शिंदे साहेबांनी खासदार केलं असा हा जादूगार माणूस आहे. एकनाथ शिंदे हा माणूस बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. तो माणूस कोणाला विधानपरिषदेवर पाठवेल, हे उजव्या हाताचं डाव्या हाताला देखील कळणार नाही : - गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री#GulabraoPatil #jyotiwaghmare #EknathShinde #MarathiNews #SatyaprabhaNews
  • धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या मर्यादा ओळखून आपल्या कुवतीप्रमाणे राहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा इतिहास समजून घेणं, हा काही तुमच्या हातसफाईचा आणि थोतांडाचा खेळ नाही.
.
#shivajimaharajhistory #SatyaprabhaNews #RamdasAthawale #MaharashtraPolitics #DhirendraShastri
  • महाराष्ट्रात मराठीसाठी
  • ज्या आरएसएसच्या विचारधारेने मला खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकले, त्याच विचारधारेच्या
  • 📍 आम आदमी पार्टीमध्ये नक्की काय घडलं? राघव चढ्ढांनी थेट व्हिडिओ जारी करून सांगितली
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10425
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8138
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6599
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

3512
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
IMG 20260422 WA0204

आरक्षण वर्गीकरणासाठी सोमवारी आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ आंदोलन…

25 April 2026
IMG 20260422 WA0308

अनुसूचित जाती उपवर्गीकरण म्हणजे सत्ताधारी व प्रस्थापित व्यवस्थेचे सुनियोजित षडयंत्र..

22 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026
IMG 20260425 WA0463

पाचशे कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात जनगणना प्रशिक्षण…हदगावचे तहसीलदार सय्यद उमर यांची माहिती…

26 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज