नांदेड दि.२३: स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्वराज्य संस्था कडील दिव्यांगांचे राखीव ५ टक्के निधी दिव्यांगांना वेळेवर मिळत नाही, यासाठी लोकशाही मार्गाने निवेदन देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढावी लागतात तरी सुद्धा तो निधी खर्च केला जात नाही, यासह राज्य सरकार सुद्धा दिव्यांगाच्या हिताचे निर्णय घेत नाही, चार-चार महिने त्यांचं निराधार मानधन मिळत नाही, आमदार खासदार त्यांच्याकडील दिव्यांगांचा राखीव शासन निर्णयीत निधी खर्च करत नाही मग आम्ही आजवर भरभरून मतदान करून तरी आमचा काय फायदा त्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीतीच्या वतीने स्थानिक/नागरी स्वराज्य संस्थेवर बहिष्कार टाकून २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनीच आप आपले मतदान ओळखपत्र जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत भारत निवडणूक आयोगाकडे परत करण्यात येणार असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













