मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एक लाखांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारकीला सध्या कोणताही धोका नाही. खोट्या कागदपत्रांच्या आधारे कोकाटे यांनी घर लाटल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंकडून सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आली होती. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या निकालाला कोकाटेंकडून आव्हान देण्यात आलं होतं. खालच्या न्यायालयाने दिलेला निकाल मान्य नसल्याने कोकाटेंनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आता त्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे घर लाटल्याचा आरोप
मुख्यमंत्री कोट्यातलं घर लाटण्याच्या प्रकरणात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडलेत. त्यावरून कोकाटेंचा राजीनामा कधी, हा सवाल विरोधकांनी लावून धरला आहे. पण सरकारी पातळीवर कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत अजून कोणतीही हालचाल दिसत नाहीत. बंदुकीच्या लायसन्ससाठी कोकाटेंनी जी माहिती भरली होती, त्यावरून त्यांचं बिंग फुटलं.
नेमकं प्रकरण काय?
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी 1995 मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता.
सन 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. मात्र, आता माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला आहे.














Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://accounts.binance.com/hu/register?ref=IQY5TET4
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.