• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, March 28, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न ; मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस

27 April 2025
in Top News, महाराष्ट्र, मुंबई
image editor output image 1147728098 1745728967021
32
SHARES
212
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई दि.२६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यशदा, पुणे येथे ‘ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करावे. तसेच, एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तम प्रशासनासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा, तंत्रज्ञान समजून घेत त्याचा उपयोग करणारी यंत्रणा उभारण्यावर भर द्यावा, इतर ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचे अनुसरण करावे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरांना पहिल्या दिवसापासूनच प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून सौर ऊर्जेवर वीजेची सुविधा करायची आहे. या कामांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावा. यातून रोजगाराची संधीही निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम सुरू केला असून सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. ग्रामविकास विभागाने या कार्यक्रमात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणारे अधिकारी समोर येतील. 12,500 कार्यालयांमध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणे आपल्याला शक्य झाले. त्यातून कामकाजात पारदर्शकता येण्याबरोबर प्रशासनाबाबतची विश्वासार्हता वाढणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात राज्याने मोठी गुंतवणूक केली आहे. आगामी 5 वर्षांमध्ये आपल्याला नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रत्येक 5 किलोमीटर क्षेत्रात उत्तम दर्जाच्या शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी संबंधित घटकांचे सहकार्य घेणे महत्त्वाचे आहे. ‘लखपती दीदी’सारख्या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करून मोठे परिवर्तन घडवून आणता येईल. बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचविता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायतराज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळा येथे ग्रामविकास विभागाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेले सिंगल युनिफाईड पोर्टल, संचालक ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय यांनी तयार केलेल्या आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड, आयुक्त मनरेगा नागपूर यांनी तयार केलेल्या पीएमएवाय आणि नरेगा डॅशबोर्डचे उदघाटन आणि राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानाअंतर्गत बनविलेल्या चित्रफितीचे अनावरण, तसेच राज्यातील २० जिल्हा परिषदांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमावर आधारित पुस्तिकेचे व महाआवास त्रैमासिकाचे प्रकाशन केले.

यावेळी मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे प्रधान सचिव, यशदाचे महासंचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

#सत्यपाल न्यूज #नांदेड

Previous Post

आरोग्य म्हणजे काय? | आरोग्य राखण्याचे महत्त्व व उपाय | २०२५ मध्ये निरोगी राहण्याचे मार्ग

Next Post

सकाळ बदलली तर आयुष्य बदलेल: जाणून घ्या सकाळच्या ५ जादुई सवयी

Next Post
सकाळ बदलली तर आयुष्य बदलेल: जाणून घ्या सकाळच्या ५ जादुई सवयी

सकाळ बदलली तर आयुष्य बदलेल: जाणून घ्या सकाळच्या ५ जादुई सवयी

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • Devendra Fadnavis on LockDown : देशात खरंच लॉकडाऊन लागणार? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती...
.#devendrafadnavis #mumbainews #SatyaprabhaNews #lockdown
  • सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा वाढलेल्या किमतीचा भार हा आता तेल कंपन्याच सहन करणार आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना अधिकच्या दरात पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागणार नाही.
.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
.
#DevendraFadnavis #Bjp #SatyaprabhaNews #Petrol
  • मेडिकल क्षेत्रात एआयला देखील महत्त्व आलं आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांना आरोग्य सुविधा 5-8 किमी अंतरात उपलब्ध व्हावी हा आमचा प्रयत्न आहे. डिजिटल महाराष्ट्र आणि विकसित महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत आम्ही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र #DevendraFadnavis #Medical #LatestNews #Maharashtra #MarathiNews
  • तुमचं चर्चामूल्य शून्य झालं आहे. तुम्ही पुण्यातील संपूर्ण शिवसेना विकून टाकली. तुमच्याकडे वैचारिक पातळी असेल तर समोरासमोर भिडा. युद्धाचे नियम असतात, कुटुंबीयांना मध्ये आणायचं नाही. अशोक खरातच्या पाण्याच्या प्रकरणात ‘मातोश्री’चा कोणताही संबंध येत नाही. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट#SushmaAndhare #SheetalMhatre #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #LatestNews MarathiNews
  • तुमचा राग अशोक खरातबद्दल आहे,
हे समजण्यासारखे आहे; परंतु त्या
पीडित महिलांचे व्हिडिओ कोणीही
सोशल मीडियावर
टाकू नयेत! :अंजली दमानिया#SatyaprabhaNews #AnjaliDamania #ashokkharat #MarathiNews
  • महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नैतिकता म्हणून दिला असेल तर पक्षाची नैतिकता नाही का? चाकणकर पायउतार होऊ नये असं सुनील तटकरेंना वाटत असेल. चाकणकर यांना सुनील तटकरेंचं सुरक्षा कवच आहे. - सुषमा अंधारे, नेत्या, शिवसेना ठाकरे गट#SushmaAndhare #RupaliChakankar #SushmaAndhare #SunilTatkare #NCP AshokKharat
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • खरात आता जेलमधून बाहेर सुटणार नाही,तो अनेक वर्ष जेलमध्ये राहील अशी परिस्थितीआज तरी आहे.
.
#SanjaySirsat #AshokKharat #SatyaprabhsNews
  • वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण
.
#FuelPriceHike #PetrolDieselPrice #NayaraEnergy #MaharashtraNews #SatyaprabhaNews #NandedNews #Inflation #BreakingNewshttp://www.satyaprabhanews.com/big-blow-to-vehicle-owners-citizens-shocked-by-sudden-increase-in-fuel-prices-at-more-than-900-petrol-pumps/12150/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10351
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8050
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6478
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

599
Ashok Kharat

रुपाली चाकणकरांचे प्रदेशाध्यक्षपदही गमावणार?

21 March 2026
Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
image editor output image1245353243 1773725714015

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश आ.खरात

17 March 2026

Recent News

Petrol-Rate

वाहनधारकांना मोठा धक्का! ९०० हून अधिक पेट्रोल पंपांवर इंधन दरवाढ; अचानक झालेल्या दरवाढीने नागरिक हैराण

26 March 2026
IMG 20260326 145353

2चिकाळा येथे आठवी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन…

26 March 2026
Himayatnagar News

‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’चा धडाका! हिमायतनगर पोलिसांची पोटा बु. येथे मोठी कारवाई; ४ लाख ८८ हजारांचा गुटखा जप्त

24 March 2026
image editor output image562855037 1774325584303

खुलेआम भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी अंनिस पोलिसांना देणार.

24 March 2026

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Ashok Kharat

अशोक खरात प्रकरणी मोठे खुलासे! कोणाला थांगपत्ताही नव्हता, थेट बेडरुममध्ये घुसून कारवाई

19 March 2026
image editor output image1246276764 1773725843814

बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत भीषण आग जयस्तंभ चौकात ६ ते ७ दुकाने जळून खाक ६० ते ७०लाखाचे नुकसान

17 March 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज