• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Friday, June 26, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मुलांना पुरवठा करणारा आरोपी गारखेड्यातून जेरबंद ! छापेमारीत दोन लाखांच्या 400 बनावट नोटा जप्त, मेडिकल व किराणा दुकानदारांना द्यायचे डुप्लिकेट नोटा !!

Satyaprabha News by Satyaprabha News
28 October 2023
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
IMG 20231028 213509

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | विजय पाटील |
दि : २८/१०/२०२३ मुकुंदवाडी परिसरात ५ मुलांकडून १९ नोटा जप्त केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अॅक्टिव झाले अन् विधीसंघर्ष मुलांच्या माध्यमातून मेडिकल, किराणा दुकानांत या डुप्लिकेट नोटा चालवून त्या बदल्यात खर्या चिल्लर नोटा जमवायच्या गोरखधंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या मुलांना एक अज्ञात मोबाईलधारक ५०० रुपयांच्या बनावट नोटा पुरवायचा. केवळ मोबाईल क्रमांकावरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. त्याच्या गारखेडा परिसरातील घरावर छापा टाकून पोलिसांनी ५०० रुपयांच्या ४०० बनावट नोटा जप्त केल्या असून आरोपीला पोलिसांनी अटक केली. यापूर्वी ज्या पाच मुलांना पोलिसांनी पकडले होते त्यातील एक सज्ञान आहे. अशा या दोघांना कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सज्ञान मुलगा देवेंद्र उर्फ भैय्या मोरे व नोटा पुरवठा करणारा राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर गारखेडा परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उप आयुक्त परिमंडळ क्रं. २ कार्यालय छत्रपती संभाजीनगर शहर व पोलीस ठाणे मुकुंदवाडी पोलीसांनी सामूहिक कामगिरी करून भारतीय चलनी नोटांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा बाजारात चालविणारी टोळीचा पर्दाफाश करून टोळीतील सदस्यांकडून ५००/- रु दराच्या एकूण ४१९ बनावट नोटा असे २,०९,५००/- जप्त केले.
दि. २७/१०/२०२३ रोजी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ शिलवंत नांदेडकर यांना संजयनगर कमान मुकुंदवाडी भागात काही मुले ५०० रुपयांच्या बनावट नोटा ह्या ख-या नोटा असल्याची बतावणी करून मेडीकल दुकाने, किराणे दुकानावर चालवित आहे. ही खात्रीलायक माहीती मिळाल्याने त्यांनी त्यांच्या कार्यालयाचे पोलीस उप निरीक्षक हरीष खटावकर व पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांना सदर माहीतीची खात्रीकरून कार्यवाहीचे आदेश दिले.
त्यावरुन परिमंडळ – २ कार्यालायचे पोलीस उप निरीक्षक हरीष खटावकर व मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे विशेष पथकाचे पोउपनि घुनावत त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्या भागांत जावून मुलांचा शोध घेतला. संजयनगर मुकुंदवाडी कमानीजवळ व संजयनगर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ चार अल्पवयीन मुले व १ सज्ञान मुलगा देवेंद्र उर्फ भैय्या मोरे असे पाच मुले ५०० रुपये दराच्या १९ बनावट नोटां बाळगतांना मिळून आले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांना बनावट नोटांचा पुरवठा करणाराचे नाव पत्ता माहित नसून फक्त त्याचा मोबाईल नंबर असल्याची माहिती मुलांनी दिली. याप्रकरणी पोलीस ठाणे मुकुंदवाडी येथे पोलीस अंमलदार गणेश वैराळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात संजयनगर येथील मुलांकडुन मिळालेल्या मोबाईल क्रमांक धारकाचा आनंदनगर पुंडलिकनगर परिसरात शोध घेतला. बनावट नोटा पुरवठा करणार राहुल गौतम जावळे (रा. नवनाथनगर गारखेडा परिसर) यास या गुन्ह्यात अटक केली. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात ५०० रुपये दराच्या एकूण ४०० बनावट नोटा मिळून आल्या आहेत. सदर गुन्ह्यातील दोघा सज्ञान आरोपीतांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोउपनि झनकसिंग नरसींग घुनावत हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ शिलवंत नांदेडकर, सहा. पोलीस आयुक्त, डॉ. रणजीत पाटील उस्मानपुरा विभाग, पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हरीष खटावकर, पोउपनि झनकसिंग घुनावत, सफौ आम्ले, सफौ नरसिंग पवार, पोह बाबासाहेब कांबळे, पोह प्रकाश गायकवाड, पोना गणेश वैराळकर, पोना विनोद गिरी, पोना सुखदेव जाधव, पोअं समाधान काळे, पोअं अनिल थोरे, पोअं गणेश वाघ, पोअं संदिप वैद्य पोअं गोकुळ खटावकर यांनी केली.
सत्यप्रभा न्यूज

Previous Post

नांदेड जिल्ह्यातील तिन्ही शहीद मराठा तरुणांना मदत जाहीर- डॉ. श्रीकांत पाटील…
👉🏻डॉ श्रीकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला तात्काळ यश…

Next Post

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या मराठवाड्यातील खासदारचा राजीनामा

Next Post
image editor output image 910399624 1698585620390

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या मराठवाड्यातील खासदारचा राजीनामा

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • हे लोक कोण आहेत, कचऱ्यात पडले होते. आम्ही त्यांना त्या कचऱ्यातून उचलून खासदार बनवले. त्यांना शिव्या काय द्यायच्या, त्यांना भर रस्त्यात जोडे मारायला हवेत.
#SanjayRaut #ShivSenaUBT SatyaprabhaNews #UddhavThackeray #MaharashtraPolitics
  • संजय दिना पाटील यांनी जे काही केलंय, त्याला हिंमत म्हणत नाहीत, ते आतून कमालीचे घाबरले आहेत. माणूस जितका जास्त हिंसक होतो, तितकाच तो आतून घाबरलेला असतो.
- सुषमा अंधारे, उपनेत्या, शिवसेना ठाकरे गट
- .
#SushmaAndhare #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • सरकारला पाठिंबा देणारे खासदार किती निर्ढावले आहेत, त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल, पत्रकारांना खुलेआम मी मारेन, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला पाठवा, हे बोलण्याचं धाडस कधी येतं? तर आपण सत्ताधीश आहोत, सत्ताधारी आहोत, आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करु शकत नाही, अशी सरकारबद्दल ज्यावेळी भावना होते, त्याचवेळी इथपर्यंत मजल जाते.
- भास्कर जाधव आमदार, शिवसेना UBT
#BhaskarJadhav #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews
  • गद्दारांना गद्दार नाही म्हणायचं, तर काय महात्मा म्हणायचं? - संजय राऊत खासदार, (ठाकरे गट)
#SanjayRaut #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #MarathiNews #LatestNews
  • तुमच्यात (संजय दिना पाटील) थोडी जरी हिंमत आणि लाज असेल तर आज खासदारकीचा राजीनामा द्या आणि भाजप किंवा मिंधेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवून दाखवा. - आदित्य ठाकरे, आमदार, शिवसेना ठाकरे गट
#AdityaThackeray #SanjayDinaPatil #SatyaprabhaNews #MaharashtraPolitics #MarathiNews latestnews
  • तुम्ही परत इकडे आलात तर मी तुम्हाला मारुन पाठवेन. हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन. हे मी तुम्हाला पोलिसांसमोर सांगतोय, तुम्हाला करायचंय ते करा. - संजय दिना पाटील, खासदार (शिंदे गट)
#SanjayDinaPatil #MaharashtraPolitics #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • आणीबाणीचे समर्थन हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही केले होते, कारण देशात अराजकता पसरली होती. हे भाजपचे नेते तेव्हा उघडपणे पोलिसांना आणि सत्तेला आव्हान देत होते.
  • नसरापूर अत्याचार प्रकरणात भीमराव कांबळे दोषी, सत्र न्यायालय 29 जूनला शिक्षा सुनावणार
#CrimeNews #nasrapurcase #SatyaprabhaNews #maharashtra #MarathiNews
  • कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवताना सरकारने विलंब केला नाही. आता कच्चे तेल $115 वरून $75 पर्यंत आले आहे. मग पेट्रोल-डिझेलचे दर कमी कधी होणार? की तेल महागलं की जनतेच्या खिशावर हल्ला आणि स्वस्त झालं की सरकारच्या तिजोरीचा उत्सव? जनतेने नेहमीच फक्त भार सहन करायचा, दिलासा मात्र कधीच नाही? - अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या#anjalidamania #IndianPolitics #PetrolDieselRates #MarathiNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 548252535 1685356041380

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

0
image editor output image1726156324 1685356360185

गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

0
image editor output image1783743501 1685356629739

सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

0
मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

0
IMG 20260624 183341

आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

24 June 2026
image editor output image460745060 1782109764423

नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

22 June 2026
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026

Recent News

IMG 20260624 183341

आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

24 June 2026
image editor output image460745060 1782109764423

नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

22 June 2026
Fathers Day

बाप नावाचा अथांग महासागर…

21 June 2026
image editor output image 403175914 1781548284491 1

आयुक्त दालनासमोर दिव्यांगांचा ठिय्या; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

16 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260624 183341

आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

24 June 2026
image editor output image460745060 1782109764423

नांदेड विधान परिषद निवडणुकीत खासदार आष्टीकरांना मोठा धक्का आणि मुलगा कृष्णाचा दारुण पराभव !

22 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज