“मान्सुनपुर्व नालेसफाईची उर्वरीत कामे तात्काळ पुर्ण करण्याचे दिले आदेश”
नांदेड दि.१४ : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके मार्फत शहरात करण्यात आलेल्या मान्युनुपूर्व नालेसफाईच्या उर्वरीत कामा संदर्भात महापालिकेत दिनांक १४.०६.२०२४ रोजी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी आढावा घेतला.
या बैठकीस उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त (स्वच्छता) मो.गुलाम सादेक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.मिर्झा फरहतुल्ला वेग, क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव, रमेश चवरे, रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, उपअभियंता दिलीप टाकळीकर, सतीश ढवळे, विश्वनाथ स्वामी, प्रकाश कांबळे, व्यंकटेश गोकुळे, तसेच सर्व स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.
बैठकी दरम्यान सर्व स्वच्छता निरीक्षकांनी आप-आपल्या वार्डात पाणी साचणाऱ्या जागांची ओळख करुन घेऊन बांधकाम विभागाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होण्यासाठी तात्काळ आवश्यकत्या उपायोजना करण्याच्या सुचना यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिल्या आहेत.
तसेच महानगरपालिका हद्दीतुन नैसर्गिक उताराने प्रवाहीत होणाऱ्या बहुतांश नाल्यांची रुंदी अतिक्रमणामुळे अतिशय अरुंद झाली असल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, त्यामुळे मनपा हद्दीतुन प्रवाहीत होणाऱ्या मुख्य नाल्यांची रुंदी वाढवुन त्यावरील अतिक्रमणे काढण्याची सुचना यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी केली.
शहरातील मुख्य रस्ते व पुलांवरील आवश्यक त्याठिकाणी ड्रेन-होलची साफसफाई करुन घेऊन तसेच लहान पाईप ऎवजी त्या ठिकाणी मोठे पाईप टाकुन घेऊन नाल्यातील सांडपाणी प्रवाहीत राहील याची दक्षता घेण्याच्या सुचना सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना यावेळी देण्यात आल्या आहेत.
तसेच आगामी काळात बकरी ईद सुध्दा साजरी होणार असल्याने स्वच्छता विभाग व क्षेत्रिय कार्यालयाने दक्ष राहुन नागरीकांची कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना सुध्दा यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.
पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुयोग्य पध्दतीने होण्याच्या दृष्टीकोणातुन मान्सुनपुर्व नालेसफाईची उर्वरीत कामे तातडीने पुर्ण करुन तसा अनुपालन अहवाल सर्व क्षेत्रिय अधिकारी यांनी सादर करण्याबाबत यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी आदेशीत केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













