
प्रसार माध्यमाची व उपोषण कर्त्याची प्रशासनाने दखल घ्यावी :- मागणी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील नरेगा नळ योजना विहिर, फिल्टर पाणी मशिन, अंगणवाडी साहित्य, अंतर्गत नाल्या व इतर विविध विकास कामे न करता परस्पर सरपंच, उपसरपच,रोजगार सेवक, ग्रामसेवक यांनी अभियंताच्या संगनमताने कागदोपत्री कामे दर्शवून शासनाचा निधी उचलून हडप केला आहे. याची गावकऱ्यांसमक्ष चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करूनही प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न प्रशासना कडून होत आहे त्यामुळे एकंबा येथील ग्रामस्थांनी दि ७ ऑक्टोबर रोज सोमवारपासून असंख्य ग्रामस्थांनी तहसील कार्यालय प्रांगणात आमरण उपोषण सुरु केला आहे. जोपर्यंत जनतेसमोर चौकशी केली जाणार नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्र गावकऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान, या उपोषणाला माधवराव देवसरकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात विविध विकास कामात मोठा अपहार व गैरव्यवहार झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी संबंधितांना ह्याचा जाब विचारला असता त्यांच्या कडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने येथील ग्रामस्थांनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र देऊन हिमायतनगर तहसील प्रांगणात विविध विकास कामात झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात ग्रामस्थांनी येथील सरपंच उपसरपंच, रोजगार सेवकासह तत्कालीन ग्रामसेवकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत यांच्यावर कार्यवाही होणार नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचे भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन या उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी एकंबा येथील ग्रामस्थांनी केली आहे…एकंबा येथील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आमरण उपोषनास भ्रष्टाचारी सरपंच प्र. व ग्रामसेवकांनी उपोषणकर्त्यां महिला व ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची उपोषण स्थळी जाऊन जाहीर माफी मागितली तरी पण ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे पण येथील गटविकास अधिकारी जाधव यांनी या उपोषणकर्त्याची भेट देऊन उपोषण करू नका आम्ही चौकशी करू, असे तोंडी सांगितले होते पण अद्याप कुठलीही चौकशी केली नाही त्यामुळे एकंबा गावातील सरपंच, उपसरपंच , रोजगार सेवक, व तत्कालीन ग्रामसेवक यांनी संबंधित विभागाच्या अभियंता यांना हाताशी धरून कागदोपत्री कामे दाखुन शासनाचा आलेला निधी परस्पर उचलुन एकंबा गावच्या विकासासाठी आलेला लाखो रुपयाचा निधी हडप केल्याचे सविस्तर चौकशी अंती सिद्ध होईल वरील कामे झालीत का नाही ? याबाबतचा पंचनामा गांवकऱ्यासमक्ष करावा. संबंधित दोषींवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करावी. याबाबत किती दिवसात चौकशी आणि कार्यवाही करणार ह्याचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना द्यावा, तरच हे उपोषण मागे घेण्यात येईल अशी भूमिका गावकऱ्यांनी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी घेतली आहे त्यामुळे आता तरी जिल्हा प्रशासनाने या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

चौकट
एकंबा गावात भ्रष्टाचार करणाऱ्यांना तात्काळ निलंबित करा…. वैभव कंदेवाड…

हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथील ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्याला प्रशासन पाठीशी घालत आहे मागील अनेक दिवसांपासून वृत्तपत्र व प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या प्रकाशित होऊन सुद्धा प्रशासन त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही करण्यास तयार नाही ह्याची जिल्हा प्रशासनाने आता गांभीर्याने दखल घेऊन उपोषण कर्त्या महिला व ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी वैभव कंदेवाड सह सुजाण नागरिकांतून होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड