दिवंगत तुकाराम गाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रजासत्ताक दिनी नविन उपक्रम
उमरखेड दि.२९ : दिवंगत तुकाराम भागाजी गाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोरी ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे “प्रजासत्ताक दिनाच्या” निमित्ताने
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार व “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार ” हे दोन पुरस्कार चालु केले आहेत. दरवर्षी शाळेतील एक मुलगा व एक मुलगी यांची गुणवत्ता,उपस्थिती ,निटनेकेपणा,नेतृत्व कौशल्य,हस्ताक्षर,वक्तृत्त्व/गायन/कला/क्रिडा /इतर सांस्कृतीक कार्यक्रमात सहभाग,प्रामाणिकपणा,आज्ञाधारकपणा, स्पर्धापरिक्षेत सहभाग,अवांतर वाचन,अभ्यासु वृत्ती या निकषांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असुन पुरस्काराचे स्वरूप हे शालेय साहित्य संच व पुष्पगुच्छ असे आहे.
या वर्षीचा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यार्थी पुरस्कार” प्रेम संदीप बनसोडे तर “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार”
गायत्री कामाजी माने या विद्यार्थ्यांना जाहीर झाला.
या पुरस्काराचे वितरण सौ.रेणुकाबाई प्रकाश गाडगे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच धनंजय माने,उपसरपंच शिवाजी माने, तंटामुक्ती अध्यक्ष रामराव माने, पोलीस पाटील प्रदिप माने, व्यवस्थापन समिती अध्यक्ष धोंडु माने,संतोष माने, राजु माने, दिगंबर माने,मारोती माने,पंजाब रोकडे,सुरेश माने,अशोक रोकडे, प्रविण गाडगे,मुख्याध्यापक कैलास कोंडरवाड सर, घनश्याम सुगमवाड,सुरेश गिते, अवित राठोड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














Hello! This post could not be written any better! Reading through this post reminds me of my good old room mate! He always kept chatting about this. I will forward this article to him. Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!
What’s Happening i’m new to this, I stumbled upon this I have discovered It absolutely useful and it has aided me out loads. I hope to contribute & help different customers like its helped me. Great job.