नांदेड दि.१२: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या प्रभारी प्र- कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सिगंबर नेटके, प्र-वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, प्रा. डॉ. दिपक शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लीकार्जुन करजगी, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम,विधी अधिकारी डॉ. विनायक भोसले, सहा. कुलसचिव डॉ. सरिता येनावार, रामदास पेदेवाड, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, उद्धव हंबर्डे, शिवराम लुटे, कुंदा पाटील, शिवकांता तांबोळी, रेखा लोखंडे, उज्वला हंबर्डे, शोभा पोटफाडे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनीही जिजाऊ मॉ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
# सत्यप्रभा न्युज # नांदेड