• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, July 14, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र औरंगाबाद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना छत्रपती संभाजीनगर विभागात २४ लाख ३९ हजार ५०४ अर्जांना मंजूरी:विभागीय आयुक्त दिलीप गावडे

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
8 August 2024
in औरंगाबाद, Top News
34
SHARES
226
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

छत्रपती संभाजीनगर दि. ८ : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात २६लाख २४ हजार ४६१ अर्ज प्राप्त झाले असून त्यातील २४लाख ३९हजार ५०४ अर्जांना मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आदींसह विविध योजनांच्या माहितीबाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपायुक्त जगदिश मिनियार, उपायुक्त सुरेश वेदमुथा आदी उपस्थित होते. 

विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर विभागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत २६लाख २४ हजार ४६१ अर्ज प्राप्त झाले असून २४ लाख ३६ हजार ५०४ अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. अंशत: ९१ हजार ७३ अर्ज नाकारण्यात आले असून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तत्परतेने या अर्जांनाही मंजूरी देण्यात येणार आहे. विभागात एकूण आतापर्यंत ९४ टक्के अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत विभागातील २० हजार ६६० पदे विविध आस्थापनांनी अधिसूचित केली आहेत. २० हजार ४६२ उमेदवारांनी या योजने अंतर्गत नोंदणी केली असून यामधील ३ हजार ५४९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर विभाग राज्यात अग्रेसर असल्याचा उल्लेख विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी केला. 

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागात उज्ज्वला योजने अंतर्गत एकूण १४ लाख ७ हजार ३२५ गॅस जोडणीधारकांची संख्या आहे. यामध्ये ७लाख १० हजार ३२४ गॅस जोडणीधारकांची ई-केवायसी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत उर्वरित काम प्रगतीपथावर सुरू आहे. 

मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागात शैक्षणिक सत्र २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात २४ हजार ५०० प्रवेशित मुली अपेक्षित आहे. यापैकी अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या अंदाजे १६ हजार विद्यार्थींना १०० टक्के शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात मुलींना मोफत तांत्रिक शिक्षण योजने अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी ११ हजार विद्यार्थींनी असा लक्षांक ठेवण्यात आला असल्याचे श्री.गावडे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी जिल्ह्यांमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली असून अर्ज स्वीकारणे व छाननी करण्याची कार्यवाही सूरू करण्यात येत असल्याची माहिती श्री.गावडे यांनी दिली. 

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजनेचा लाभ ७.५ एचपी पर्यंत विद्युत भार असणाऱ्या कृषि वीज ग्राहकांना मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ७.५ एचपी पर्यंत असणाऱ्या एकूण ११ लाख ४६ हजार ९०३ कृषि ग्राहकांना सुमारे ५१२.३६ कोटी रुपयांचे त्रैमासिक बिले माफ होऊन योजनेचा लाभ मिळणार आहे. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहायक साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र यांच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी  मुख्यमंत्री वयोश्री  योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून अर्ज स्वीकारणे व छाननी करण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेसाठी आवश्यक निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी सांगितले.

#सत्यप्रभा न्युज #औरंगाबाद 

IMG 20240808 194404
Previous Post

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करा:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी नांदेड  येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

Next Post

इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी नांदेड  येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025
    image editor output image 548252535 1685356041380

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0
    image editor output image1726156324 1685356360185

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0
    image editor output image1783743501 1685356629739

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026
    image editor output image 1101186215 1783005415809

    शासकीय कार्यक्रमातील घटनेनंतर दिव्यांग युवकाच्या सक्षम हातालाही फ्रॅक्चर; उपचारासाठी खाजगी रुग्णालयाची धाव, प्रशासनाने तातडीने मदत करावी – राहुल साळवे

    2 July 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    © 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज