तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेला उस्फूर्त प्रतिसाद
पोलीस प्रशासनाच्या वतीने शनिवार 30 मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतुन पोलीस व जनता यांच्यातील समन्वयक दृढ व्हावा जनतेच्या अडी अडचणीचा जागेवरच निपटारा व्हावा या हेतूने आयोजित केलेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारीवर्गाच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या बैठकीत नांदेड शहरासह जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त केलेल्या अडी अडचणी जाणून घेत संबंधिताचे जागेवरच समाधान केले. पोलीस प्रशासनाने दुर्गा व गणेश उत्सवा दरम्यान राबविलेल्या सिसिटिव्ही उपक्रमात मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी हद्दीतील गावभेटीत केलेल्या जनजागृतीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून फायदेशीर ठरत असल्याने सिसीटिव्ही कॅमेरा उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करीत हदगांव तालुक्यातील सर्वात मोठ्या हद्दीतील मनाठा पोलीस ठाण्यात अनेक पदे रिक्त पदे असल्याने अनेक अडचणी निर्माण होत असल्याने रिक्त पदासह जवळपास विस गावासाठी असलेल्या दुरक्षेत्र बरडशेवाळा पोलीस चौकी मागील काही वर्षांपासून फक्त झेडावंदना पुरतीच वापरात येत असल्याने बरडशेवाळा पळसा परिसरासह बामणी फाटा बाजारपेठेत गुन्हेगाराचे मनोबल वाढत असून सर्व सामान्याला अनेक अडचणीममुळे छोट्या मोठ्या कामानिमित्त जवळपास बेसोयीचे पंधरा किलोमीटर अंतर अनेक अडचणीचा सामना करीत मनाठा येथे पोलीस ठाण्यात येजा करावी लागत असल्याने बरडशेवाळा पोलीस चौकी उपयोगात आणावी अशी मागणी विरशैव शिवा संघटना नांदेड जिल्हा उपाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर यांनी लेखी निवेदनातून व्यक्त केली आहे.






















