पुतण्याने केली काका सहित इतर भावांची जमीन हडप.न्यायालयाच्या निकालानंतरही ताबा देण्यास टाळाटाळ
धर्माबाद ता. प्र. दत्तात्रय सज्जन दि.९: तालुक्यातील मौजे सायखेड येथे प्रमुख राज्य रस्त्यावर कोट्यावधी रुपये किंमत असलेली आपले काका व त्यांच्या मुलांची जमीन हडप करून त्या जमिनीवर अनाधिकृत प्लॉटिंग टाकून विक्री करत आपल्या रक्ताच्याच नात्याला बेघर केल्यामुळे डुमने कुटुंबीय कालपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
धर्माबाद तालुक्यातील मोजे सायखेड येथील प्रमुख राज्य रस्त्यावर असलेल्या गट क्रमांक 82 मधील वाटणी झालेली जमीन देविदास जवळ ढुमणे यांनी 47 जणांना बॉण्डवर प्लॉट विक्री करून गुंड प्रवृत्तीने अतिक्रमण करून महसूल व पोलीस प्रशासनास खोटे कागदपत्र दाखल करून विक्री केली.
सदरील जमीन ही न्यायप्रविष्ठ असताना व न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही 4 एप्रिल रोजी उपोषण कर्ते शेतीत मशागत करण्यासाठी गेले असता देविदास डुमणे व त्यांच्या तीन मुली यांनी 112 या नंबर वर पोलीस कॉल करून माझ्या शेतात चुकीच्या पद्धतीने मशागत करीत आहेत त्यांना जर हाकलून दिले नाही तर आम्ही सर्व विष पिऊन मरतो आणि तुमच्या देखत झाडाला फाशी घेतो अशी धमकी दिल्यावर सायखेड बीटचे जमादार यांनी आनंदा संभाजी डुमणे यांना शेतातून हाकलून दिले.तक्रारकर्ते आनंदा संभाजी हे सत्तर वर्षाचे निरक्षर असून कर्णबधिर आहेत.त्यांच्या नावावर भाऊ हिस्साप्रमाणे गट क्रमांक 82 मधील क्षेत्र एक हेक्टर 42 आर एवढी जमीन प्रत्येकाच्या नावाने आली. परंतु त्यांचा पुतण्या देविदास जळबाजी डुमणे यांनी त्यांची फसवणूक करीत परस्पर त्या जमिनीवर 47 जणांना अनधिकृत प्लॉट विक्री करून करोडो रुपयांची कमाई केल्याचा आरोप देविदास डुमणे यांच्यावर करण्यात आला आहे. सदरील प्रकरण हे न्यायप्रविष्ठ असून न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही जळबा डूमणे हे कब्जा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे उपोषणकर्ते कुटुंबांना पोलीस संरक्षण मिळावे व बीट जमादारांच्या कार्य पद्धतीची कसून तपासणी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, पोलीस निरीक्षक यांनी आम्ही आपणास संरक्षण देऊ शकत नाही त्यासाठी तहसील मधून मला पत्र आलेले आहे असे सांगितल्यावरून त्या गोष्टीची सत्यता काय आहे ते पडताळावी, या व भाऊ हिश्याप्रमाणे आलेल्या जमिनीचा आम्हाला तात्काळ ताबा मिळवून द्यावा या महत्त्वाच्या मागणीसह कालपासून आनंदा संभाजी डुमणे, जमनाबाई आनंदा डुमणे, संभाजी प्रकाश डुमणे, नमिता संभाजी डुमणे हे आपल्या मुलाबाळा सहित तहसील कार्यालय समोर उपोषणास बसले असून अद्याप प्रशासनाने सदरील उपोषणाची कुठलीच दखल न घेतल्यामुळे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
चौकट– काल सदरील उपोषणास पाठिंबा म्हणून उमरीचे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते डी.जी. तूपसाखरे, पत्रकार सवई, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ सल्लागार जे. के. दादा जोंधळे यांच्यासह पत्रकार किशन कांबळे व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
