• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, June 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Breaking News : यापुढे इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय

Satyaprabha News by Satyaprabha News
5 April 2025
in Top News, पुणे
Dinanath Mangeshkar Hospital: धर्मादाय रुग्णालय असताना एवढ्या पैशांची मागणी का? रुग्णसेवेच्या नावाखाली धंदा सुरुय का?
42
SHARES
277
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

Deenanath Mangeshkar Hospital: रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पुणे: पुण्यात भाजप आमदाराचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांना वेळीच उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. त्यानंतर आता रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आम्ही इथून पुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही. रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत माहिती दिली आहे. दुर्दैवी घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाची मान शरमेने खाली गेली.
दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांच्या नावाला काळेफा असल्यामुळे आमची मान शर्मिला खाली गेली. सगळं पाहून लता मंगेशकर यांना मानणारे लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे, असे परिपत्रक म्हटले आहे.

  • पत्रात नेमकं काय म्हंटलंय?
  • कालचा दिवस दिनाच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा…
  • आजपर्यंत केलेल्या कामाची जाणीव न ठेवता ोर्चेकर्‍यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली..
  • काही महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर घैसास यांच्या हॉस्पिटलची तोडफोड केली..
  • काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तर लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळे फासले..
  • हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली..
  • हे पाहून लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे..
  • या सर्व गोष्टींनी निराश होऊन विश्वस्त मंडळांची काल बैठक झाली..
  • लोक कशा पद्धतीने चुकीचे वागत आहे किंवा या घटनेला राजकीय रंग कसा येत चालला हे सोडून आम्ही आत्मचिंतन केले..
  • झालेल्या दुर्दैवी घटनेमागे दिनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे चुकीचे चालले.. तरीसुद्धा आम्ही रुग्णालयाकडून संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे तपासात आहोत..
  • सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः जमेल तेवढी रक्कम भरा असे सांगितले..मात्र तरीसुद्धा ते कोणालाही न करता निघून गेले..
  • दीलनाथ रुग्णालय सुरू झालं तेव्हा पुन्हा तेही रूपातील अनामक रक्कम घेतली जात नसेल…
  • मात्र रुग्णालयाचे नाव वाढत गेले आणि गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेल्यामुळे अनामत रक्कम देण्यास सुरुवात झाली..
  • कालच्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला..
  • इथून पुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूममधून आलेला असतो पण डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो
  • लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्याच्याकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही..
  • असा ठराव विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी केला असून त्याची अंमलबजावणी आजपासून होईल..
  • झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशी बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत.

ट्रस्टींचं पत्र जसच्या तसं
माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो,

2001 साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५००० आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला charity कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साधींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले.
कालचा दिवस दीनानाथ च्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता. आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता, रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली, महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला व तोडफोड केली, एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले व या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या. हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली व लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवच जाणे.
हेचि काय फळ मम तपाला, इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नये अशा प्रकारचे सर्व विचार व सल्ले मिळू लागले. या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली व त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. लोकं कशा पद्धतीने चुकीचे वागत आहेत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चालला आहे हे सोडून देऊन, आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले.
हा सर्व विचार करीत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला -‘असंवेदनशीलता’ अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंडमारा.
झालेल्या दुर्दैवी घटनेमागे व मृत्यू मागे दीनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणे जरी चुकीचे चालले असले तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रति संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत. सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल तेवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते निघून गेले.
जेव्हा दीनानाथ सुरू झाले तेव्हा कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम (डिपॉझिट) घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार व शस्त्रक्रिया व रुग्णालयाचे नाव वाढत गेल्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली. कालच्या उद्विग्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दिनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलो असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला व आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु ह्या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू-भगिनींनी व माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी.

Tags: Dinanath Mangeshkar HospitalPunePune NewsSatyaprabha News
Previous Post

नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का! उत्तर भारतातही हादरे, उत्तराखंडमधील पिथौरागढ हे भूकंपाचं केंद्र

Next Post

Raj Thackeray: बँकांमधलं आंदोलन थांबवा, उदय सामंतांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Next Post
Raj Thackeray: बँकांमधलं आंदोलन थांबवा, उदय सामंतांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Raj Thackeray: बँकांमधलं आंदोलन थांबवा, उदय सामंतांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • "माझ्या आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल!" — अभिजीत दीपके
.
#NEETExam #EducationMinister #DharmendraPradhan #StudentProtest #SatyaprabhaNews
  • लोक म्हणतात, निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांनी काय साध्य होतं? यातून हेच ​​सिद्ध होतं की आपण जिवंत आहोत! सरकारसाठी आपण कदाचित किडे असू, पण आपण जिवंत आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यास सक्षम आहोत. - अभिजित दीपके, संस्थापक, काॅकरोच जनता पार्टी#cockroach #cjp #abhijitdipake #CockroachJanataParty #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost #LatestNews
  • Abhijit Dipke Delhi Airport : अभिजीत दीपके दिल्लीत दाखल. #CockroachJantaParty
  • भाजप सदस्य राहावे की तामिळ लोकांशी जोडलेले राहावे, हे ठरवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मी 4 डिसेंबर 2025 रोजी पक्षाला कळवले होते की मी राजीनामा देणार आहे. पक्षाने मला सांगितले की, आधी निवडणुका संपू द्या आणि मग पक्ष सोडा. - के. अण्णामलाई, माजी भाजप प्रदेशाध्यक्ष
.
#KAnnamalai #BJPGovernment #SatyaprabhaNews #tamilnadupolitics #MarathiNews
  • राहुल गांधींचा अंदमान निकोबारमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद
ग्रेट निकोबार बेट वाचवण्याचा संदेश
.
#RahulGandhi #nicobar #SatyaprabhaNews #andaman #scubadiving MarathiNews
  • "मी भारतात येतोय, माझं नशीब संविधानाच्या हातात सोपवत आहे. जयभीम !"
.
#Cockrochjanataparty #AbhijitDipake #SatyaprabhaNews #MarathiNews #BreakingNews
  • सलमान सर, महेश सर अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र. महेश सरांमुळे सलमान सर मलाही ओळखू लागले, एकदा मी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. आणि तिथेच बाजूला ते बिग बॉसचा प्रोमो शूट करत होते. मी लगेच महेश सरांना म्हटलं, "त्यांना भेटायला जाऊ का?", त्यावर ते सहज "जा" म्हणाले... त्यांच्यासाठी जाणं सोपं होतं, कारण त्यांची मैत्री आहे, पण माझ्यासाठी ते
  • एकाची दोन्ही पदे गेली आणि दुसऱ्याला तिसरे पद रोहित पवारांच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!पुणे दि.५ जून: राजकारणात कधी कुणाचे पारडे जड राहील आणि कुणाला अनपेक्षितपणे पायउतार व्हावे लागेल याचा कोणताही नेम नसतो. सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अशाच एका नव्या समीकरणाची आणि नेत्यांच्या छुप्या रणनीतीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. सत्तेतील अंतर्गत घडामोडींवरून आणि पदांच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे....http://www.satyaprabhanews.com/both-the-first-and-second-positions-were-taken-and-the-second-and-third-positions-were-rohit-pawaran-and-navya-davyachi-state-discussion/12499/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10441
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8265
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

6410
Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
New Project 19 1 4228019836

राजकीय वर्तुळात चर्चा विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाची बंडखोरी दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?

2 June 2026
Jamkhed News

पिंपरखेड ते कवडगाव रस्त्यावरील विंचरणा नदीपूलाचा प्रश्न मार्गी लावा;शेख मोहिदीन यांचे रोहित पवारांकडे साकडे

2 June 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Nanded News

विधान परिषदेसाठी तिरंगी लढत : भाजपचे राजूकर, उबाठा-आष्टीकर तर वंचितकडून इंगोले रिंगणात

4 June 2026
image editor output image825762831 1780377029391

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा ! एमआयडीसीत नोकरीचा मार्ग मोकळा

2 June 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज