विजय पाटील
छत्रपती संभाजी नगर दि.१२ : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून शिंदे गटाचे उमेदवार विलास भुमरे यांना आव्हान देणारे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी आता ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
रविवारी (१० नोव्हेंबर) त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गार्डे यांना समर्थन देत आ. अंबादास दानवे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. या वेळी आप्पासाहेब सोलाट, रामनाथ केदारे, हारुण शेख, सुरेश शेळके, सतीश पल्लोड व तिरुप टाक यांनीही डॉ. शिंदे यांच्यासोबत ठाकरे गटात प्रवेश केला. माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे, तालुकाप्रमुख आनंद भालेकर,तालुका संघटक सोमनाथ जाधव, मुरली चौधरी, सचिन घायाळ, सचिन तायडे,नारायण घोडके व राजेंद्र दानवे उपस्थित होते. पैठण मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांचे काम शिंदे गटाने न केल्याने त्यांचा पराभव झाला, असा आरोप भाजप पदाधिकारी करत असतात. आता विधानसभा निवडणुकीत त्यांना हा वचपा काढण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी भुमरे यांच्याविरोधात आहेत. वरिष्ठ स्तरावरून सूचना मिळूनही काही पदाधिकारी ऐकायला तयार नाहीत. उलट ते पक्ष सोडून देत असल्याचे डॉ. शिंदे यांच्या निर्णयामुळे समोर आले आहे
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!