सत्यप्रभा न्यूज नेटवर्क
नागेश शिंदे
न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवू.
हिमायतनगर दि.२८: तालुक्यातील मौजे एकंबा ग्रामपंचायतीती झालेल्या भ्रष्टाचारा प्रकरणी दि २४ जानेवारी पासून ग्रामस्थांचे हिमायतनगर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु असताना उपोषणकर्त्यांमधील दोघांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे त्यांना हिमायतनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार दिला आज उपोषणाचा पाचवा दिवस उजाडला आहे तरी पण येथील प्रशासनाने त्यांच्यावर कार्यवाही केली नाही चौकशीच्या नावावर उपोषणकर्त्यांची दिशाभूल करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात एकंबा येथील ग्रामस्थ महिलांनी ह्या प्रकरणी न्याय मिळाला नाही तर लवकरच आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील एकंबा ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व रोजगार सेवकांनी कागदोपत्री कामे दाखवून ग्रामपंचायत मध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी २४ जानेवारीपासून हिमायतनगर येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर तंटामुक्त समिती अध्यक्ष राम कंदेवाड,यशवंत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रमेश तुमदे, श्रीरंग सुर्यवंशी, गणेश घुंगराळे, राजू राणे, राविकुमार कानिंदे, वैभव कंदेवाड यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यापैकी आमरण उपोषणातील तंटामुक्त समिती अध्यक्ष राम कंदेवाड, श्रीरंग सूर्यवंशी या दोघांची प्रकृती तिसऱ्या दिवशी रविवारी (दि. २६) खालावली होती तेव्हा उपोषण स्थळी डॉक्टरांनी उपस्थित होऊन तात्काळ हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करूनत्यांच्यावर उपचार केले आहेत पण आज दिनांक २८ जानेवारी रोजी उपोषणाला पाच दिवस होऊन सुद्धा एकंबा गावातील नागरिकांच्या पाठपुराव्याला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे एकंबा येथील ग्रामस्थांनी तिसन्यांदा सुरु केलेल्या उपोषणाची शासन व प्रशासन कुठलीही दखल घेत नाही उलट त्या ग्रामसेवक व सरपंचांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न हे प्रशासन करीत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणाची तक्रार कर्त्यांच्या समक्ष चौकशी होऊन संबंधित भ्रष्टाचाऱ्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नसल्याची भूमिका एकबा येथील ग्रामस्थांनी घेतली आहे आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी गावातील असंख्य महिलांनी येथील गटविकास अधिकारी जाधव यांना या प्रकरणाचा जाब विचारला असता गटविकास अधिकारी यांनी चौकशी करतो असे उडवाउडवीचे उत्तर दिले त्यामुळे एकबा येथील महिलांनी भ्रष्टाचारा विरोधात न्याय न मिळाल्यास येथील पंचायत समिती कार्यालयासमोर येत्या काही दिवसात आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड