नांदेड दि.१७: काही शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून आपला प्रवेशाचा कोटा पूर्ण करत आहेत. त्यात मुखेड पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरदरीच्या एका शाळेने पंधरा द्या बारावीला प्रवेश घ्या. व दहा हजार द्या, वार्षिक परीक्षेत कॉफी करण्यास सवलत दिली जाईल.असे आमिष विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थी हजरी पट भरत आहेत. बारावीनंतर विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य खऱ्या अर्थाने सुरू होते. म्हणून बारावी सहज मार्गाने व जास्त मार्काने कसे पास होता येईल या प्रयत्नात विद्यार्थी व पालक असतात. सिडको नांदेड येथील एका शाळेत दहावी चा व बारावीचा निकाल चांगला लागतो म्हणून या शाळेत प्रवेशास विद्यार्थ्यांची पसंती असते. तर याच शाळेच्या इतर दोन शाळा असून तेथे विद्यार्थी संख्या फारच कमी असते म्हणून सिडको नांदेड शाळेचे मुख्याध्यापक यांनी ही एक शक्कल लढवून आमच्या दुसऱ्या शाळेत प्रवेश देतोत व शिक्षण या शाळेत घ्या. असे आमिष दाखवत प्रवेशास सुरुवात केली. तर उमरदेवीच्या एका शाळेने बारावी क्रॉप सायन्स व कॉम्प्युटर सायन्सला प्रवेशासाठी 15000 द्या व कॉपी करायची असेल तर दहा हजार द्या. दहा हजार दिले तर वार्षिक परीक्षेत कॉपी करण्यास मदत केली जाईल. असे आमिष दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळेत कॉपी करू देण्याच्या बोलीवर 10 वि व 12 वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल आहे. याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असून गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे काही पालक वर्गातून अशा आमिषाला नाराजी व्यक्त होत असून शिक्षण विभागाने लक्ष द्यावे व परीक्षेच्या वेळेला अशा काही शाळेत विशेष स्कॉड स्थापन करावे अशी मागणी पालकातून होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













