श्री परमेश्वर मंदिर येथे संत ज्ञानेश्वरी कथेचे आयोजन
हिमायतनगर ता.प्र. नागेश शिंदे दि.१९: पवित्र श्रावण मासानिमित्त श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना दरवर्षी पवित्र श्रावण मासा मध्ये भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यानिमित्ताने श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून भव्य संगीतमय शिवपुराण कथा व आता दि १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत ह भ प श्री अर्जुन महाराज खाडे आळंदी यांचे भव्य संगीतमय ज्ञानेश्वरी कथेचे आयोजन परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी येथे सुरू आहे ह्याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान मंदिर कमिटीकडून करण्यात आले आहे
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पवित्र श्रावण मासानिमित्त परमेश्वर देवस्थान कमिटी येथे संगीतमय ज्ञानेश्वरी कथेचे आयोजन करण्यात आले आहे या संगीतमय ज्ञानेश्वरी कथे प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना सांगताना ज्ञानेश्वरी हे कलियुगातील वाघिणीचे दूध आहे ज्यांनी ज्यांनी ज्ञानेश्वरीचे वाचन केले त्यांना अपारशक्ती व ज्ञान प्राप्त होते या पृथ्वीतलावर ज्ञानेश्वरीची बरोबरी करणारा कुठलाच दुसरा ग्रंथ नाही ज्ञानेश्वरी माणसाच्या जीवनाचा उद्धार करणारा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी हे सर्व सामान्य माणसाला समजायला व कळायला थोडी अवघड आहे पण ज्या दिवशी ज्ञानेश्वरी कळली तेव्हा तिच्या एवढा शक्तिमान प्रभावशाली दुसरा कुठलाच ग्रंथ नाही असे अनमोल मार्गदर्शन ह. भ. प.श्री अर्जुन महाराज खाडे आळंदी यांनी भव्य संगीतमय ज्ञानेश्वरी कथे प्रसंगी बोलताना सांगितले त्यामुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यातील भाविक भक्तांनी श्री परमेश्वर मंदिर येथे पवित्र श्रावण मासानिमित्त सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाचा सर्वांनी दररोज दुपारी २ ते ५ या वेळात लाभ घ्यावा असे आव्हान श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून करण्यात आले आहे यावेळी हजारो महिला पुरुष व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
