
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासंदर्भातील बेताल वक्तव्य केल्यामुळे हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टी तर्फे शुक्रवारी दि 9 फेब्रुवारी रोजी सकाळी श्री परमेश्वर मंदिर समोर पंतप्रधान मोदीजी हे जन्मावेळी ओबीसी नव्हते, असे बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला
या प्रसंगी काँग्रेसनेते खासदार राहुल गांधी हे वारंवार ओबीसीविरोधी बेताल वक्तव्ये करत असून एक प्रकारे पक्षाची भूमिकाच ते मांडत आहेत असा आरोप हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीयुवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी त्यांच्यावर केला आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे जन्मावेळी ओबीसी नव्हते, असे बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, मा केंद्रीय राज्यमंत्री भाजपानेत्या मा.सूर्यकांताताई पाटील, नांदेडचे खासदार मा.प्रतापरावजी पाटील चिखलीकर व नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या आदेशवरून हिमायतनगर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार यांच्या उपस्थीतीत दिनांक 9 फेब्रुवारी रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर खा. राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या बेताल व्यक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला..
यावेळी..तालुका अध्यक्ष गजानन चायल,युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस कल्याण ठाकूर,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष लक्ष्मण डांगे,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष हिदायद खान , शहर अध्यक्ष विपुल दंडेवाड,रुपेश नाईक,शीतल सेवनकर,ओमकार चर्लेवार,राहुल नरवाडे,परमेश्वर नागेवाड,प्रीतम गुंडेवार,शंकर जाधव सह भाजपा युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…