धर्माबाद ता. प्र.दत्तात्रय सज्जन दि१९: शहरातील महावीर चौकावरील आय लव धर्माबाद हा सेल्फी पॉईंट म्हणजेच धर्माबाद शहराच्या सौंदर्यात अप्रतिम भर पाडणारा असल्याच्या प्रांजळ प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.पुनम ताई पवार यांनी केले.
धर्माबाद नगरपालिकेचे अतिशय कृतीशील ठरलेले मुख्याधिकारी सतीश पुदाके यांच्या संकल्पनेतून शहरातील महावीर चौक येथे आय लव्ह धर्माबाद हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन सौ पुनमताई पवार यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केले. यावेळी मुख्याधिकारी सतीश पुदाके,भाजपाचे शहर अध्यक्ष रमेश अण्णा गौड ,अशोकराव चव्हाण यांचे एकनिष्ठ शंकर अण्णा बोलमवाड, ताहेर पठाण, यांच्यासह भाजपाचे सतीश भाऊ मोटकुल, व्हाईस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय कदम, माजी उपनगराध्यक्ष विजय राठौड, माजी नगरसेवक दिनेश राहेरकर,गुलाब पाटील मोरे,साईनाथ बोईनवाड,गजानन कुरुंदे, अजित पिंजारी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुमलता पटकुटवार, नगरपालिकेचे लेखापाल गुरुनाथ कस्तुरे, संतोष पवार, अशोक घाटे किरण बिचकेवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळेस आकाशात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली असून खरोखरच ह्या सेल्फी पॉइंटने धर्माबादच्या शहराच्या सौंदर्यात अनोखी भर पडल्याच्या प्रतिक्रिया अनेक मान्यवरांकडून येत आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
