हिमायतनगर प्रतिनिधी/- हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे शहरातील जागरूक व जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर च्या बाजूने जाणाऱ्या खडकी पांदन रस्ता स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित आहे या रस्त्यावर अनेक शेतकऱ्यासह नागरिकांची रहदारी आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत त्यामुळे या भागातील शेतकऱ्याच्या शिस्त मंडळांनी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची भेट घेऊन खडकी पांदण रस्ता सी.सी. रोड किंवा डांबरीकरण व तसेच रोडच्या बाजूने गावातील सांडपाणी जाण्यासाठी नाली बांधकाम करून देण्याची मागणी केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वातंत्र्य काळापासून प्रलंबित असलेला खडकी पांदण रस्ता हा अनेक वेळेस नकाशावर येऊन सुद्धा हा रस्ता पूर्णत्वास आला नाही त्यामुळे सदर पांदन रस्तालगत असलेल्या शेतकऱ्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे या रस्त्याच्या सी.सी किंवा डांबरीकरण रस्त्याची मागणी करून गावातील सांडपाणी दोन्हीकडे वाहते त्यामुळे सदरील रस्त्यावर अतिशय घाण साचलेली असून या भागात अतिशय दुर्गंधी होत असल्यामुळे या भागात रोगराई पसरत आहे त्यामुळे श्री परमेश्वर मंदिर पासून खडकी पांदन कडे जाणारा सीसी रोड किंवा डांबरीकरण रोड कायमचा मजबूत करून गावातील सांडपाणी या भागात येत असल्यामुळे रस्त्यालगत नाली बांधकाम करून येथील नागरिकांचा प्रश्न सोडवण्याची मागणी येथील शेतकऱ्याच्या शिष्टमंडळांनी आमदार कोहळीकर यांच्याकडे केली आहे यावेळी हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी नगरसेवक प्र. सदाशिव सातव, शिवाजी हरडपकर, सुभाष शिंदे, मोतीराम शिंदे, रामराव कोरडे, विशाल जाधव, दत्ता दंडेवाड, विठ्ठल हरडपकर, विशाल नराठे, परमेश्वर काळे, राजू निर्मले, रवी डांगे, दत्ता हळदे, शिवाजी वानखेडे ,परमेश्वर टोमके,सह आदी शेतकरी उपस्थित होते