तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
भारताची आगामी जनगणना 2027 च्या अनुषंगाने हदगाव तालुक्यातील जनगणना कामासाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कालावधी 23 एप्रिल 2026 ते 6 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून, हदगाव येथील वेंकटरमना हाय टेक इंग्लीश स्कूल येथे प्रशिक्षण पार पडत आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात चार्ज अधिकारी तथा तहसीलदार सय्यद उमर यांनी मार्गदर्शन करत जनगणना प्रक्रियेचे महत्त्व, अचूक माहिती संकलनाची जबाबदारी तसेच कामकाजाची पद्धत याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सर्व पर्यवेक्षक व प्रगणकांनी प्रामाणिकपणे आणि दक्षतेने काम पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी नायब तहसीलदार अनिल तामसकर विजय महाजन मंडळ अधिकारी तथा फील्ड ट्रेनर,आर. टी. राठोड ( फील्ड ट्रेनर), घाडके ( फील्ड ट्रेनर), अक्षय उडते ( फील्ड ट्रेनर), नागरगोजे ( फील्ड ट्रेनर), प्रतिक रामकिशन विश्वासराव ( फील्ड ट्रेनर), संदीप राठोड ( जनगणना महसुल सहाय्यक) विशाल लव्हांडे समन्वयक तथा टेक्निकल असिस्टंट, महेंद्र मुनेश्वर समन्वयक तथा टेक्निकल असिस्टंट तसेच तहसील कार्यालय हदगाव येथील कर्मचारी उपस्थित होते. जनगणनेसाठी नियुक्त पर्यवेक्षक व प्रगणकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणा दरम्यान घर गणनेचे काम करण्याची प्रक्रिया याबाबतची माहिती नोंदविण्याच्या पद्धती, तांत्रिक बाबी तसेच प्रत्यक्ष कामातील अडचणींवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे जनगणना 2027 ची प्रक्रिया अधिक सुकर व अचूक होण्यास मदत होणार आहे.






















