तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
सहभागी होण्याचे दयानंद गायकवाड यांचे आवाहन … अनुसूचित
जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी २७ एप्रिल रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर ‘महा वज्रमूठ’ बेमुदत धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोक स्वराज्य आंदोलन व समविचारी संघटनांच्या वतीने हे आंदोलन होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक भरांडे सर यांनी दिली.
डॉक्टर भांडे परांडे सर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची पायाभरणी केली. मात्र आजही अनुसूचित जातीतील काही वंचित घटकांना आरक्षणाचा अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे आरक्षणाचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. मांतग, मादगी, मेहतर, ढोर, डक्कलवार आदी वंचित घटकांना न्याय मिळावा या उद्देशाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
लोकस्वराज आंदोलन तालुका हदगाव च्या वतीने आव्हान कर्ते दयानंद गायकवाड कोळीकर यांनी केले आहे.






















