नांदेड दि. ३१ : येत्या ६ सप्टेंबर रोजी पोळा सणा निमित्ताने मेढीसाठी पळस व उबरांच्या फांद्या तोडून दारापुढे उभ्या करुन तोडून आणलेल्या फांदीची पूजा केली जाते व नैवद्ये ठेवला जातो या परंपरेबाबत गेली १२ वर्षे झाली खेड्यामध्ये, शहरामध्ये वयोवृध्द तज्ञ पंडीत अभ्या्सक यांना याबद्दल विचारले असता कोणतेही धार्मिक शास्त्रीय कारण कळाले नाही. यावर सर्वांचे उत्तर हेच आहे की, आमच्या आजोबा-पणजोबा पासुन आमचे वडील त्यांनी फांदी लावली म्हणून आम्ही लावतो तरी यामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळून आपण पोळा सणानिमित्ताने एक झाडं लावण्याचा संकल्प करावा असे आवाहन वृक्षमित्र ना.वि.कदम यांनी केले आहे.
या विषयी अधिक माहीतीं देतांना ते म्हणाले की, या परंपरे प्रमाणे गावातील हजारो घरापुढे प्रत्येक चौकटीला ग्रामदेवतेला या फांद्या एका कुटूंबात १५ ते २० तोडल्या जातात. वृक्षतोडीमुळे प्रदुषित झालेल्या काळात ही प्रथा (रुढी) योग्य आहे काय? म्हणुन आपण बुध्दीपूर्वक विचार करुन रोपवाटीकेतून कोणतेही दोन झाडे घेवूया व मुख्य चौकटीला लावुन या जीवंत झाडामध्ये देव पाहून याची पूजा करुन त्यानंतर योग्य ठिकाणी लावू या असा संकल्प पाळला पाहीजे असे ते म्हणाले
सर्वांनी आधुनिकता स्विकारुन या प्रकारच्या अनेक झाडे-फांद्या-पाने तोडणाऱ्या प्रथा बंद कराव्यात जसे लग्नासाठी हिरवा मांडव ,पोळ्याला पळसमेढ, दसऱ्याला आपटा, हरितालिकेला पाने, दिवाळी लक्ष्मीपूजन, तोरणे, पाडवा तोरण फांद्या यासाठी झाडतोड फांद्यातोड पाने तोड करुन आपण दृष्टीचा नाश करत आहोत. यासाठी झाडे लावण्यास कोणी तयार नाही. यासाठी आपण पर्याय निवडावा व आपले उत्सव सण साजरे करावे. आपला वाढदिवस, निरोप समारंभ, राखी भेट, लग्नामध्ये भेट या प्रकारच्या अनेक कार्यक्रमातून एकतरी झाड लावावे त्याचे संवर्धन करावे व पर्यावरण प्रदुषण टाळावे, कारण प्रदुषणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना सारख्या महामारीमध्ये आपणास ऑक्सीजनचे महत्व कळाले. जे झाडे देतात म्हणून आपणास विनंती आहे श्रध्दा ठेवा पण अंधश्रध्दा नष्ट करा आपले आरोग्य टिकवा झाडे लावा झाडे जगवा असा संकल्प शेवटी ना.वि.कदम यांनी व्यक्त केला आहे .
चौकट…
वृक्षरोपण व संगोपन काळाची गरज ..!
पळसावर कुऱ्हाड चालवून दारापुढे फांदी लावण्या पेक्षा रोपवाटिकेतील एक जिवंत झाड आपल्या चौकटीला लावून त्याची पूजा करा पळस वाचवा पर्यावरण टिकवा झाडे लावा झाडे जगवा असा संकल्प करा ही विनंती.वृक्षमित्र,
श्री ना.वि.कदम पाटील (वाळकीकर),
सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पंचशील मा. व उच्च मा. विद्यालय हदगाव ,
तालुकाध्यक्ष, निसर्ग व सामाजिक पर्यावरण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य,
संपर्क: 9403525468
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













