
हिमायतनगर प्रतिनिधी/-महाराष्ट्रातील पुणे येथे एका कार्यक्रमासाठी गेलेले मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके यांच्यावर काही समाजकंठकांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांची बदनामी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला त्या भ्याड हाल्याच्या निषेधार्थ हिमायतनगर येथे दिनांक 3 ऑगस्ट रोज गुरूवारी निषेध रॅली काढण्यात आली यावेळी उपस्थित समाज बांधवांनी समाजामध्ये झुंडशाही करणाऱ्या काही समाजकंटकाचा दहन म्हणून काही प्रत्येकात्मक पोस्टर जाळून तालुक्यातील ओ.बी.सी. समाज बांधवांनी दुपारी १२ वाजता श्री परमेश्वर मंदीरासमोर डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी करत ह्या झुंडशाही करणाऱ्या समाजकंठकांचा जाहीर निषेध केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर दि.30 सप्टेंबर रोजी पुणे येथे एका सार्वजनिक कार्यक्रमास जात असताना त्यांना रस्त्यात गाठून काही मराठा जातीच्या समाजकंठकांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसारित करून त्याना बदनाम करण्याचे कटकारस्थान काही लोकांनी व समाजकंठकानी केल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ दि. 3 ऑगस्ट 2024 रोजी शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर झुंडशाहीच्या प्रतीकात्मक पोस्टरचे दहन करण्यात येऊन ह्या घटनेच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली या प्रसंगी दादागिरी नही चलेगी… नही चलेगी … नही चलेगी…. झुंडशाही नही चलेगी… नही चलेगी … नही चलेगी…. अश्या घोषणाबाजी करण्यात आली व तसेच ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांना तात्काळ Z + सुरक्षा देऊन हल्लेखोरांना त्वरीत अटक करा अशी मागणी ओबीसी समाज संघटणा तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड, दिलीप राठोड, सुनील चव्हाण, प्रकाश हाके, रवी जोनापले, बाळु मुडगूलवाड, गजु बाचकलवाड, आनंदा मूतणेपवाड, सदाशिव सातव, पि.के. चव्हाण, दत्तराव हाके, साईनाथ आनमवाड, नितेश हाके, पांडुरंग आडे, बापूराव डूडुळे, माधव मेचेवाड, संतोष चव्हाण, रवी राठोड. लक्ष्मन ढानके, मारोती अकलवाड, शिवराम लिंगमपल्ले गणेश घोसलवाड, देसाई राऊलवाड. आदींसह ओबीसी समाज बांधवानी केली येथील पोलीस प्रशासनास केली आहे यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची अटक करून सुटका केली.