नांदेड दि.२९: लोहा पोलिसांनी टाटा एस वाहनांमध्ये 5.25 लाख रुपयाचा बनावट सूर्य छाप जर्दा तंबाखू व गुटखा जप्त केला. यात दोन आरोपींना अटक केली असून लोहा पोलिसात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
लोहा पोलिस चे पोलीस निरीक्षक चिंचोलकर साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नांदेड कडून लोहा कडे बनावट तंबाखू व गुटखा वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे तात्काळ एक टीम तयार करून नांदेड कडे जाणाऱ्या रोडवर टीम रवाना करण्यात आली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी टीम थांबून होत्या.
तेव्हा नांदेड कडून एक टाटा एस चार चाकी गाडी येत असताना पोलिसांनी तिला अडवून पकडले त्या 35 बॉक्स बनावट सूर्य छाप जर्दा तंबाखू मिळून आला. तर त्याच गाडीमध्ये विमल,ए-1,आदत/ए ए ए नावाचा गुटखा ही मिळून आला.
सदर वाहनातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जागीच सदर गाडीतील दोन्ही आरोपींना अटक केली.
पकडलेल्या टाटा एस गाडीचा क्रमांक mh 04 fp 0910 असा असून या वाहणा बाबत पोलीस पुढील तपास करत आहे.
यातील आरोपी हे नांदेड येथील असून त्यांची नावे शेख समेर शेख आयुनोदीन वय 21 वर्ष, नुरी चौक गोविंद नगर नांदेड, सय्यद अमेर सय्यद महमद अली वय 22 वर्ष खुदबेनगर चौरस्ता, नांदेड अशी आहेत.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड













