छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विजय पाटील दि : १८:महाप्रसादातील मसाले भात कच्चा राहिल्याची तक्रार करणाऱ्या भक्ताला रक्तबंबाळ होण्याची वेळ आली. त्याच्या डोक्यात कडे घालणाऱ्या तरुणाविरुद्ध बिडकीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गणेश मच्छिंद्र लाड (वय ३७, रा. हिवाळे गल्ली बिडकीन) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. साडेसहाच्या सुमारास बाजारतळ बिडकीन येथे असलेल्या महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेला होता. तेथे भंडाऱ्यानिमित्त महाप्रसादाचे वाटप चालू होते. दर्शन घेऊन मंदिराबाहेर आला त्यावेळी कृष्णा भारत फुलारे यांनी मसाले भाताचा प्रसाद दिला. प्रसाद घेऊन बाजूला येऊन खाल्ला. भात कच्चा वाटल्याने गणेशने कृष्णाला मसाले भात कच्चा राहिल्याचे सांगितले.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!













