क्षेत्रिय कार्यालय ३ शिवाजीनगर अंतर्गत १ भुखंड जप्त
नांदेड दि.२९ : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आता कर वसुलीसाठी ऍक्शन मोडवर आली असुन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने व अति. आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त(कर) अजितपालसिंग संधु यांच्या नियञणाखाली कर वसुलीसाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असुन प्रत्येक क्षेञीय कार्यालयास जप्ती व वसुलीसाठी उद्दीष्ठ दिलेले आहे.
त्याअनुषंगाने आज दि.२९ जानेवारी २०२५ रोजी क्षेत्रिय कार्यालय क्र.३ शिवाजीनगर अंतर्गत मालमत्ताधारक सेक्रेटरी संध्याछाया वृध्दाश्रम या मालमत्तेवर करापोटी रक्कम रु.३,८३,६१४/- येणे शिल्लक होते परंतु संबंधितांनी कर भरणा करण्यास असमर्थतता दर्शविल्यामुळे संबंधितांचा भुखंड जप्त करण्यात आला आहे.
सदरील कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे,कर निरिक्षक पुरुषोत्तम कामतगीकर, श्री राजेश क-हाळे,कार्यालय अधिक्षक श्री राहुल चौधरी,वसुली लिपिक श्री विशाल राजभोज,शिपाई अझहर खुरेशी यांनी पार पाडली आहे.
शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या थकीत कराचा भरणा करावा या उद्देशाने कर भरणाऱ्या नागरिकास दि.३१जानेवारी पर्यंत शास्तीवरील रक़्क़मेत ४० टक्के सूट देण्यात येत आहे. याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. जनसंपर्क विभाग, नां.वा.श.म.न.पा.नांदेड़
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड













