नांदेड दि.१२: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
मुख्य प्रशासकिय इमारत, तिसरा माळा, प्रशिक्षण हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास अतिरीक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त (प्र.) कारभारी दिवेकर, उपायुक्त निलेश सुकेवार, अंतर्गत लेखा परिक्षक सुधिर इंगोले, विधी अधिकारी अजितपालसिंघ संधु, सहा-आयुक्त गुलाम सादीक, सहा-आयुक्त डावरे मॅडम, शहर अभियंता दिलीप आरसुडे, कार्यकारी अभियंता रफतउल्लाखान, संघरत्न सोनसळे यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड