नांदेड: १८: ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा वसमत विधानसभा मतदार संघात आली होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वात या यात्रेमध्ये णसंसदरत्न खा.डॉ. अमोल कोल्हे साहेब, रा.कॉ.युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.सुनिल गव्हाणे, आमचे जेष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय जयप्रकाशजी दांडेगांवकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनिल कदम साहेब,सामाजिक न्याय विभाग राज्यप्रमुख पंडीत कांबळे. उद्योगव्यापार सेल चे राज्यप्रमुख श्री फाटे साहेब, उपस्थित होते. या यात्रे दरम्यान नांदेड शहर जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व तसेच कार्यकर्त्यांना निवेदनासाठी वेळ दिला होता. पक्षाच्या वतीने शहर जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापूरकर यांनी नांदेड तालुक्यात व उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पारंपारिक राजकीय सामाजिक, सहकार, शिक्षण ,वैद्यकीय ,यासह अनेक विविध क्षेत्राचे नेतृत्व सहकार महर्षी पद्मश्री शामरावजी कदम साहेब यांनी केलेले आहे. व तसेच त्यांच्या सोबतीने माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर जी कदम साहेबांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेला आहे. आणि आज स्थितीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नेतृत्व डॉ. सुनील शामरावजी कदम हे करीत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून पद्मश्री शामरावजी कदम साहेबांचा सामाजिक सहकार शैक्षणिक वैद्यकीय वारसा ते चालवत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम साहेब यांच्या नेतृत्वात या मतदारसंघात पक्ष संघटन व मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर सर्व जाती धर्मातील जनतेचे अडीअडचणीत धावून जाणारे नेहमी उपलब्ध राहणारे निस्वार्थ कार्य करणारे म्हणून डॉ.सुनील शामरावजी कदम यांची ओळख आहे.या मतदारसंघात ८० टक्के ग्रामीण भाग हा पूर्णा सहकारी साखर कारखान्या च्या कार्यक्षेत्रात येतो. डॉ . सुनील कदम या कारखान्याचे उपाध्यक्ष असून त्या भागातील बहुतांश गावांमध्ये थेट शेतकऱ्यांशी संपर्क आहे. डॉ. सुनील शामराव कदम हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मागील पंचवार्षिक काळात अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये व तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघात कार्य केलेले आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून मराठवाडा लोकसभा मंडळ नेरली कृष्णधाम या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी या माध्यमातून कुष्ठरोगी,मतिमंद गतिमंद, निराधार बालकांचे पालन पोषण करीत आहेत. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय पेशातून मागील ३५ वर्षापासून शहर आणि ग्रामीण व तसेच जिल्ह्यात त्यांनी वैद्यकीय सेवा दिलेली आहे. व नांदेड शहर जिल्ह्यात कार्यक्षेत्रात उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघ आहेत. सन २००९ मध्ये निर्माण झालेल्या या मतदारसंघांपैकी उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पक्षश्रेष्ठीकडे सातत्याने मागणी केली आहे. राज्याच्या जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीमुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळू शकला नाही. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची ताकद असताना देखील तात्कालीन आघाडीचे स्थानिक नेत्यांनी त्यांच्या सोयीसाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या मतदारसंघात एकंदरीत जिल्ह्यात वाढू नये म्हणुन यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न झालेले आहेत. त्याचा भाग म्हणून उत्तर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू दिला नाही. नांदेड शहर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी व पक्षात वाढीसाठी उत्तर विधानसभा व दक्षिण विधानसभा पैकी एक मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणे अत्यंत गरजेचे आहे हक्काचा मतदारसंघ असल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने देण्यात येणारा उमेदवार हा शंभर टक्के त्या ठिकाणी आपल्या ताकदीवर निवडून येऊ शकतो आणि कार्यकर्त्यांना बळ मिळते याकडे पक्षश्रेष्ठीने बारकाईने व गांभीर्याने विचार करून हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सोडून घ्यावा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ताकद देण्यासाठी पक्ष वाढीसाठी पक्षाने ताकद लावून आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ डॉ.सुनील कदम साहेब यांच्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडून घ्यावा या प्रमुख मागणीसह विविध विषयावर निवेदन केले. यावेळी पक्ष्याच्या अनेक पदाधिकारी यांनी सुद्धा या अनुषंगाने मागणीचे निवेदन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तातेराव पाटील आलेगावकर,बंटी लांडगे, जिल्हा सरचिटणीस गणेश अण्णा तादलापूरकर,सय्यद मौला,प्रकाश मुराळकर, महिला जिल्हाध्यक्षा सिंधुताई देशमुख, शिखसेल जिल्हाध्यक्ष प्रेमजितकौर कोल्हापुरे, हसीना बेगन,मुहमद्दी बेगम,युवक ग्रा.जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, शिखसेल उपाध्यक्ष तरविंदरसिंघ बडगुजरा, डॉ.दत्तात्रय कदम,विधानसभा अध्यक्ष गजानन वाघ,दत्ता पाटील तळणीकर,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष फैजल सिद्दिकी,ग्राहकसेल जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर,उद्योग व्यापार सेल जिल्हाध्यक्ष नितीन मामडी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गंगाधर महाजन,दिगंबरराव पोपले,गोवर्धन पाटिल,सहकार सेल जिल्हाध्यक्ष रमेश पावडे,रसूल भाई, सेवादल जिल्हाध्यक्ष गोविंद यादव,सामाजिकन्याय विभाग जिल्हाध्यक्ष राहुल जाधव, कृ.ऊ.बा.स.संचालक नाना पोहरे,माजी नगरसेवक अब्दुल्ला खान,असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष सिराज अली आदी प्रमुख पदाधिकारी व उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड
