
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नुकतेच हदगाव येथे जनता दरबार घेऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सक्त तंबी दिली होती की जनतेच्या कामांमध्ये कामचुकार पणा केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही असे सांगितल्या नंतर हिमायतनगर येथे उद्या दिनांक 13 जानेवारी रोजी तहसील कार्यालय प्रांगणात आयोजित आमदार बाबुराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या भव्य जनता दरबाराची हिमायतनगर शहरासह तालुक्यातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धसकी घेऊन रविवारी आपले कार्यालय सुरू ठेवून तक्रार करते हे जनता दरबार मध्ये प्रश्न मांडणार असल्याची चुणूक अधिकाऱ्यांना लागताच कागदोपत्राची जुळवा जुळव सुरू केल्याचे दिसून येत आहे…..
हिमायतनगर शहरा सह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आयोजित जनता दरबार बैठकीला निमंत्रित राहण्याची विनंती पंचायत समिती व तहसील कार्यालयामार्फत पूर्वकल्पना देऊन केली व वैयक्तिक सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी निमंत्रित केले त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांवर सतत होणारा अन्याय येणाऱ्या काळात होऊ देऊ नका त्यांना आपल्या कार्यालयात खेटे मारायला लावू नका अशा सूचना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी तालुक्यातील अधिकाऱ्यांना एक पूर्वकल्पना दिली होती त्यामुळे त्यांनी सतत जनतेचे प्रश्न अधिकाऱ्यासमोर मांडण्यासाठी सार्वजनिक जनता दरबार ठेवून या जनता दरबारामध्ये जनतेच्या तक्रारीची तातडीने निपटारा झाला पाहिजे यासाठी दिनांक 13 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता हिमायतनगर शहरातील तहसील कार्यालय प्रांगणात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शहरातील बांधकाम, महावितरण, पोलीस नगरपंचायत, तहसील सह विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी हा जनता दरबार ठेवण्यात आला आहे त्यामुळे या जनता दरबाराची धास्ती अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागल्याची दिसून येत आहे नुकतेच हदगाव येथे संपन्न झालेल्या जनता दरबारामध्ये आमदार कदम यांनी येथील कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांना सक्त तंबी दिली होती की जनतेच्या कामांमध्ये काम चुकारपणा केल्यास घरी बसावे लागेल असा सूचना तिथे दिल्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील प्रशासन मात्र खडाडून जागे झाले असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या हिमायतनगर शहरातील जनता दरबाराची तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धसकी बसल्याचे दिसून येत आहे….