नांदेड दि.११: मा. अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, ईतवारा अति पदभार नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पोलीस ठाणे अंतर्गत सतत पेट्रोलींग ठेऊन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या.
सदर सुचनांप्रमाणे मा. परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे श्री. आर. डी वटाने, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकों दत्तराम जाधव, पोहेकॉ विजयकुमार नंदे, पोहेकॉ मनोज परदेशी, पोना शरदचंद्र चावरे, पोकों बालाजी कदम, पोकों रमेश सुर्यवंशी, पोकों इम्रान शेख, पोकॉ भाऊसाहेब राठोड, पोकों अंकुश पवार हे पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, उर्वशी महादेव मंदीर समोर नांदेड याठीकाणी एक ईसम ज्यांने रेल्वेस्टेशन व बसस्थानक परीसरामध्ये लोकांची नजर चुकवुन त्यांचेकडील मोबाईल फोन काढुन घेतलेले आहेत. सदरचे मोबाईल फोन हे विक्री करण्याच्या बेतामध्ये असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहीतीच्या ठीकाणी छापा मारला असता सदर ठीकाणी एक ईसम मिळुन आला. त्यांने त्यांचे नाव किरण ऊर्फ छोटया विश्वास तुळशे वय २२ वर्षे व्यवसाय बेकार रा. लिबंगाव ता.जि. नांदेड असे सांगीतले.
नमुद ईसमांस त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये त्याचे ताब्यात एक पांढऱ्या रंगाची होन्डा अॅक्टीवा गाडी आला व १४०२१ एक खंजीर मिळुन व सदर गाडीच्या डीकीत संशयितरित्या एकुण १६ मोबाईल फोन आढळुन आले. त्यास सदर मोबाईल फोनच्या मालकी हक्काबाबत विचारणा करता त्यांचेकडे कोणत्याही प्रकारचे बिल आढळुन आले नाही. त्यास विश्वासात घेडुन विचारणा करता त्यांने सदरचे मोबाईल फोन हे बसस्थानक ते रेल्वेस्थानक परीसरामध्ये लोकांची नजर चुकवुन काढुन घेतले असल्याचे सांगितले. त्यांचेकडुन एक खंजर किं. अं. ५००/- रु एक होन्डा अॅक्टीवा गाडी किं.अं. ३०,०००/-रु व मोबाईल वनप्लस व्हीवो, पोको, ओपो, व रेडमी कंपनीची असे एकुण १६मोबाईल फोन किंमती २३३०००/- रुपयाचे असे एकुण २६३५००/- रु. चा मुदद्यदेमाल मिळुन आला आहे. सदर संशयास्पद स्थितीत मिळुन आलेला मुदद्येमाल संबंधाने सदर ईसम समाधान कारक उत्तरे देत नसल्याने त्याचे विरुध्द पोहेका बं. नं. १५२ मनोज परदेशी यांनी सरकार तर्फे तक्रार दाखल करुन पोलीस ठाणे वजिराबाद गुरंन ४०३/२०२४कलम ४/२५ भा.ह. का. सह कलम १२४ मपोकों प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पोहेकॉ बं. न. १७४२ प्रदीप खानसोळे व मदतनीस अमंदार पोकों प्रदीप कांबळे
यांचेकडे पुढील तपास कामी देण्यात आला आहे. तपास अधिकारी पोहेकॉ बं. न. १७४२ प्रदिप खानसोळे व त्यांचे मदतनीस पोकॉ प्रदीप कांबळे यांनी
सदर स्कुटीची खात्री करता त्या अनुषंगाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण याठीकाणी गु.र.न. ६८७/२०२४ कलम ३०३(१) बी.एनस. प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असुन उर्वरीत मोबाईल फोनचा शोध घेत आहोत.वर नमुद प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचे अनुषंगाने वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड