नांदेड दि.१२: आंतरराष्ट्रीय कथावाचक, भागवत भूषण, परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा सीहोरवाले यांची नांदेड शहरात दिनांक 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान सात दिवस शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. शिवमहापुराण कथा दररोज दुपारी एक ते चार या वेळात होईल. कथेचे स्थळ श्री कुबेरेश्वर धाम, मोदी ग्राउंड कौठा नांदेड हे असून डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार हे या शिवमहापुराण कथेचे यजमान आहेत.
ही कथा भव्य दिव्य प्रमाणा करण्यासाठी शिवमहापुराण कथा आयोजन समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज हे श्री विठ्ठलेश सेवा समिती, मुरली मनोहर कुबेरेश्वर महादेव मंदिर, चितावलिया हेमा सीहोर या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहे. समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांना महादेवाचे महत्व पटवून सांगितल्यामुळेच संपूर्ण देशातील महादेव मंदिरे परिचीत झाली आहेत. एक लोटा जल सारी समस्या का हाल याने फुलून गेली आहेत. आस्था चैनलच्या माध्यमातून जवळपास 156 देशात पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांची शिव महापुराण कथा प्रसारित होते. त्यानिमित्ताने ते देशात परिचित झाले आहेत. अशा महान आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडीत प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा नांदेड शहरात होत असल्याने नांदेडकरांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. या कथेचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजक व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड