नांदेड काँग्रेस अनुसुचित जाती विभागातर्फे बाबासाहेबांची मुर्ती भेट
मुंबई दि.१२: काँग्रेस अनुसुचित जाती विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “विजय संकल्प राज्यस्तरीय पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता मेळावा २०२४ ” नुकताच यशवंतराव चव्हाण सभागृह,मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी काँग्रेस अनुसुचित जाती विभाग राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटिया यांना नांदेड अनुसुचित जाती विभागातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मुर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या मेळाव्याला नांदेड जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर, संतोष आंबेकर यांची उपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यातील गावागावत काँग्रेस पक्ष आणि पक्षाची विचारधारा घेऊन जाण्याचे आदेश राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोटिया यांनी दिले.
#सत्यप्रभा न्युज #मुंबई