पहलगाम दहशतवादी हल्ला | (Pahalgam Terror Attack) जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा जवान सतर्क झाले असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानाने घटनास्थळी रवाना झाले आहे. (Pahalgam Terrorist Attack)आतापर्यंतच्या माहितीनुसार, हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याचं समजत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान या हल्ल्यात महाराष्ट्राच्या पुण्यातील कुटुंब जखमी झालं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली आहे.(Pahalgam Terrorist Attack)
पुण्यातील पाच जणांच कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. असावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गनबोटे आणि संगीता गाबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मिरी पोषाख घालुन फोटो काढत होतं. त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले. दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नावे विचारली. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.
पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असुन या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे. या कुटुंबासह पुण्यातील (Pune) आणखी काही पर्यटक देखील या हल्ल्यात जखमी झालेत. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
“पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना माझी मनापासून श्रद्धांजली. आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत दृढ आहोत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. आम्ही जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत,” अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.