• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, July 22, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

फुले-आंबेडकर जयंती निमित्त स्वा.रा.ती.म. विद्यापीठात रंगले कविसंमेलन

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 April 2025
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image690802653 1744454625264
35
SHARES
235
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

प्रेम, विद्रोह आणि समतेच्या सूरांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध

नांदेड दि.१२: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी , कर्मचारी व विद्यार्थी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विशेष कविसंमेलनाने विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात एक सुंदर सृजनशीलतेची आणि उत्कट भावनांची लहर निर्माण केली. या संमेलनात अनेक कवींनी त्यांच्या शब्दांतून श्रोत्यांच्या मनात समतेची, प्रेमाची, विद्रोहाची आणि प्रेमपूर्ण सहअस्तित्वाची जाणीव निर्माण केली. कवी संमेलनाच्या अध्यक्ष स्थानी सुप्रसिध्द कवी व चित्रपट गीतकार प्रकाश घोडके (पुणे) हे होते.
कवी प्रकाश घोडके त्यांच्या शब्दांच्या गंधाने संमेलनाला एक गोड रंग दिला. ‘किती शिवावं सपान आरं पापण्या फाटल्या / माझ्या आडूश्यानं उभ्या/ तुझ्या दिसती साउल्या’ अशा काळजाला साद घालणाऱ्या ओळींनी रसिकांना हळवे केले. ‘असा बावळा सावळा / पक्षी रानचा पाळला’ या कवितेतून त्यांनी प्रेमामधील सामाजिक अडथळ्यांचा जाच कथन केला. तर तब्बल चाळीस वर्षांपासून मराठी रसिकांवर आपला ठसा उमटविणाऱ्या ‘तुझ्या दाराहून जाता’ या कवितेला रसिकांनी अगदी डोक्यावर घेतले.
कवी आणि गजलकार डॉ. मुकुंद राजपंखे(अंबाजोगाई) यांनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची मनं खूप खोलवर हलवली. ‘घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे / जळमटाना पुन्हा जाळले पाहिजे’ ह्या शब्दांनी नवीन आरंभाची प्रतिमा उभी केली. त्याचप्रमाणे ‘माया पातळ करू नकोस गावाकडे येत जा / कधी-मधी माय बापाला तुझ्या घरी नेत जा’ ह्या गजलच्या माध्यमातून त्यांनी नात्यामधील हरवत चाललेल्या माणुसकीची आणि आटत चाललेल्या प्रेमाची दु:खद वस्तुस्थिती कवितेतून व्यक्त केली.
ज्येष्ठ कवी डॉ. आदिनाथ इंगोले(नांदेड) यांच्या ‘बोल भिमाचाच बोल तू, घडा धडधडा / तू तरी शिक खरा / शिक भीमाचा धडा’ ह्या प्रेरणादायी ओळींनी विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. ‘बाई भीम मव्हा देवाहून भारी देव, मंग कहाल्ये मी घेऊव दुज्याच नाव’ ह्या कवितेत त्यांनी बाबासाहेबांच्या प्रती असलेली कृतार्थेच्या भावनेला कलात्म अभिव्यक्ती दिली. ‘कबूल मी बदललो / माझी कविता बदलली / आता तू ही बदलायला हवं’ अशा एका परिवर्तनाच्या शपथेने सभागृहात उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनाला परिवर्तनाचा मंत्र दिला.
कवी डॉ. विकास कदम(नांदेड) यांच्या गजलांनी कार्यक्रमाच्या रोमांचकतेला एक नवीन दिशा दिली. ‘वाद हा कशाचा कसे लोक भडकले गेले / उद्ध्वस्त मन मंदिरात माझे श्वास दडपले गेले / त्यांचा लपाछपीचा हा खेळ सुरूच आहे / कटात कुणाकुणाचे, या हात अडकले गेले’ या ओळींमध्ये त्यांच्या शब्दांचा ठासून भरलेला सामाजिक विद्रोह प्रकटला. ‘बाबा, पुढे पुढे जातांना रस्ते तुमचेच पाय मागे ओढतांना पाहतोय / पाखंडी तुम्हाला इथल्या मठात कोंडतांना आणि तुमचीच शिदोरी चौकाचौकात मांडताना पाहतोय’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विचारपूर्ण कवितेत समतेचा आणि तत्त्वज्ञानाचा गोड मिलाफ रसिकांनी अनुभवला.

अक्षय जाधव( छ. संभाजीनगर) यांच्या कवितेचे सादरीकरण अत्यंत भावपूर्ण होते. त्यांच्या आवाजात एक गोडवा आणि शब्दाच्या संगीतातून जीवनाचा सखोल शोध घेत, त्यांनी उपस्थितांसमोर कविता प्रस्तुत केली आणि रसिकांनी त्यास भरभरून दाद दिली.
तरुण कवियत्री वनश्री वनकर(वर्धा) यांच्या कवितेत ‘आता केवळ व केवळ बुद्धाचीच पालवी इथं उमलणार आहे … मी सलीमला सोबत घेऊन येतेय .. तोवर तू वाट बघ … मी येतेय’ ह्या ओळींतून एक हळवी आणि तरीही सामाजिक जाणीवेसकट प्रेमभावना प्रकटली. वनकर यांच्या कवितेतील आंबेडकरी स्त्री जाणीवा, चळवळीतील अनुभव आणि ते सादर करण्याची अनोखी शैली याने सर्व उपस्थितांच्या मनात घर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. त्यांनी ‘बाबासाहेब मला नाहीत हजार डोळे हे जग वाचण्यासाठी, म्हणून मी समजून घेत आलोय हे जग तुमच्यातून, पुस्तकांची पाने आणि अक्षरांतून’ ह्या विचार कवितेने उपस्थितांना वर्तमान चळवळीचा खरा अर्थ समजावला. कविसंमेलनास डॉ. मल्लिकार्जुन करजगी, डॉ. अविनाश कदम, डॉ. रमेश ढगे, डॉ. संतोष देवसरकर, डॉ. सूर्यप्रकाश जाधव. डॉ. पी. विठ्ठल, डॉ. रवी सरोदे, डॉ. हर्षवर्धन दवणे, अनुपम सोनाळे, प्रकाश तारू, स्वप्नील नरबाग यांच्यासह प्राध्यापक , कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

बिलोली शहरात २२ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही

Next Post

व्हायरल हेपेटायटीस विथ मल्टी ऑर्गन फेल्युअरवर उपचार एक आव्हान: डॉ.दुर्गेश साताळकर

Next Post
image editor output image692649695 1744459662718

व्हायरल हेपेटायटीस विथ मल्टी ऑर्गन फेल्युअरवर उपचार एक आव्हान: डॉ.दुर्गेश साताळकर

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest
    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

    5 January 2024
    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

    4 September 2024
    IMG 20230904 190243

    हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

    4 September 2023
    Website Thumbnail

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

    13 April 2025

    व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

    0

    गुलाम सादिक यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका

    0

    सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणूनच विकास कामांना गती- खासदार हेमंत पाटील

    0
    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    मूल होत नसल्याने चारित्र्यावर संशय, अंबरनाथमध्ये पतीने गाठली कौऱ्याची परिसीमा

    0
    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    image editor output image 1542532143 1783084538580

    तुमचा एक फोटो ठरू शकतो देशासाठी घातक; नांदेड पोलीस अधीक्षकांचा तरुणांना सावधतेचा इशारा

    3 July 2026
    image editor output image 1097492131 1783005608008

    नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महेश पाटील रुजू

    2 July 2026

    Satyapabha News

    Satyaprabha News

    आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

    Web Stories

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
    Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

    Follow Us

    Recent News

    Sonam Wangchuk Health Updates

    Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन

    19 July 2026
    IMG 20260707 WA0137

    हदगाव तालुक्यातील महिला सक्षमीकरण योजनांच्या चौकशीची मागणी; ‘गैरव्यवहाराला माफी नाही’

    7 July 2026
    • About Us
    • Privacy & Policy
    • Contact Us
    • Hike Percentage Calculator
    • PPF Calculator
    • Age Calculator

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • महाराष्ट्र
      • मुंबई
      • पुणे
      • औरंगाबाद
      • नांदेड
      • लातूर
      • भोकर
      • हिमायतनगर
      • हदगाव
      • किनवट
    • देश-विदेश
    • राजकीय
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाइफस्टाइल
    • वेबस्टोरी
    • विशेष लेख
    • गॅजेट टूल्स
      • गॅजेट न्यूज
      • Age Calculator
      • Mutual Fund Calculator
      • PPF Calculator
      • Home Loan EMI Calculator
      • Hike Percentage Calculator
      • Retirement Planning Calculator
      • Marathi Date Converter
    • सरकारी योजना
    • Contact Us

    Copyright© 2026 SATYAPRABHA NEWS MEDIA MANAGEMENT - All rights reserved Satyaprabha News.

    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज