नांदेड दि९:सुन्नी इस्लामिक रिसर्च स्कॉलर आणि मोटिवेशनल स्पीकर जामिया रियाजुल जन्नाह, अल-अमान एजुकेशन एंड वेलफेयर ट्रस्ट आणि दारुल अमानचे संस्थापक मुस्लिम धर्मगुरू मौलाना सलमान आजहरी यांच्या जुनागढ येथील कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे गुजरात एटीएस कडून मुंबईच्या घाटकोपर येथून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या या अटकेने मुस्लिम समाजात संतापाची लाट पसरली असून समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांच्यावरील दाखल करण्यात आलेले गुन्हे परत घेऊन त्यांची सुटका करण्याची मागणी जोर धरत आहे. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी भोकर येथे एम.आय.एम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, सह समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मौलाना सलमान अजहरी यांच्या अटकेचा निषेध नोंदवून त्यांच्यावरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्य शासनाला पाठविण्यात आले. यावेळी मुफ्ती ईमरान ,हाफिज आहाद,मौलाना अकबर, मौलाना अ.खादिर, हाफिज फारूक, हाफिज सद्दाम, बाबा खाॅन नांदेड जिल्हा अध्यक्ष ग्रामीण, जुनेद पटेल भोकर तालुका अध्यक्ष, निजाम बाबा भोकर शहराध्यक्ष, शेख करीम करखेलीकर माजी तालुकाध्यक्ष, शेख सुलेमान इर्शाद खान, अहेमद भाई, जमील पठान, राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष शेख एजाज कुरेशी, राष्ट्रवादीचे भोकर शहराध्यक्ष फहिम पटेल, शेख जब्बार, सय्यद अलमास भोकर तालुका संयोजक आम आदमी पार्टी, शेख फारुख शेख मेहबूब शहराध्यक्ष आम आदमी पार्टी भोकर अब्दुल मोफेद अब्दुल सामी युवा शहराध्यक्ष आम आदमी पार्टी, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता म. ताजोद्दीन, शफी पटेल, मन्सूर पठान कोळगावकर, फारूख जहागिरदार करखेलीकर, स. जब्बार आदि समाज बांधव उपस्तिथ होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड