नांदेड दि. १३ :- नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-२०२३च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.
या आदेशात नमूद केलेल्या राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं. १८ आणि २२ नांदेड, आयन डिजिटल झोन आयडीझेड विष्णुपुरी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट क्रमांक १८आणि 22 नांदेड या 3 परीक्षा केंद्रापासून १०० मीटरच्या परिसरात १३, १५व १५ जून २०२४ रोजी सकाळी ५ते रात्री 8८वाजेपर्यंतच्या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील १०० मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड














**mitolyn official**
Mitolyn is a carefully developed, plant-based formula created to help support metabolic efficiency and encourage healthy, lasting weight management.