विजय पाटील
छत्रपती संभाजीनगर दि.२३ : संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी शनिवारी (२६ एप्रिल) आहे. यानिमित्त दौलताबाद येथील संत गोरोबाकाका कुंभार मंदिरात तीन दिवसीय उत्सव साजरा करण्यात येणार आहे
संत गोरोबाकाकांच्या संगीतमय चरित्राचे निरूपण ह.भ.प. शंकरराव महाराज जाधव करणार आहेत. हा कार्यक्रम २३ ते २५ एप्रिलपर्यंत दररोज दुपारी ४ ते ६ या वेळेत होणार आहे. २६ एप्रिलला दुपारी ४ वाजता दौलताबाद बसस्थानकापासून मिरवणूक काढण्यात येईल. त्याच दिवशी सायंकाळी महाप्रसादानंतर रात्री शंकरराव जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकल कुंभार समाज, दौलताबादच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!