विजय पाटील
खुलताबाद दि.३ :
शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये विष पिऊन ४२ वर्षीय हरिश्चंद्र नारायण सोनवणे (रा. ताजनापूर, ता. खुलताबाद) यांनी आत्महत्या केली. ही घटना ऐन दिवाळीच्या दिवशी शुक्रवारी (१ नोव्हेंबर) दुपारी १२ च्या सुमारास ताजनापूर शिवारात घडली. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.
हरिश्चंद्र सोनवणे हे मजुरी व शेतीतून कुटुंबीयांचा उदारनिर्वाह चालवत होते. शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांनी विष पिल्याचे लक्षात येताच बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्दिकी यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. खुलताबाद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजीनगर
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!