नांदेड दि.१५: नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार मिलिंद भाऊ देशमुख यांच्या प्रचारासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे शिवसेनेचे प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे यांच्या उत्साही प्रचाराच्या झंझावाताने विरोधकांनी धसका घेतला आहे. शहरातील शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या कैलासनगर ,विद्युतनगर, पाटनूरकर नगर इत्यादी भागांमध्ये डोअर टू डोअर स्वतः सुधाकरभाऊ पांढरे यांनी प्रचार करून अपक्ष उमेदवार मिलिंदभाऊ देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन केले आहे.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये हजारो कोटींचा निधी येऊन सुद्धा विकास कामे मात्र सुमार दर्जाची झालेली आहेत. शहराच्या पुढील 25 वर्षाच्या सुव्यवस्थीत वाटचालीसाठी व नियोजनबद्ध विकासासाठी मिलिंद देशमुख यांच्यासारखे जाणकार व विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व जनतेने किटली या चिन्हाच्या समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विधिमंडळात पाठवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुधाकर भाऊ पांढरे मित्रमंडळाचे अनेक कार्यकर्ते व मिलिंद देशमुख यांना मानणारे कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या. नांदेड उत्तरची विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर गाजण्यापेक्षा अनावश्यक गोष्टी विरोधकांकडून समोर आणून मतदारांची लक्ष विचलित करून गाजविली जात आहे. नांदेड उत्तरच्या मतदारांना व ग्रामीण भागातील जनतेला विकास हवा असून ते विकासाच्या पाठीमागे राहतील असा विश्वास यावेळी प्रथम महापौर सुधाकर भाऊ पांढरे यांनी व्यक्त केला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड