हिमायतनगर दि.४: हिमायतनगर शहरात दिनांक 2 जुलै रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षांवर शहरातील राम सूर्यवंशी या युवकाने त्यांच्यावर पाळत ठेवून ते सायंकाळी फिरायला गेले असता धारदार शस्त्र ने त्यांच्यावर प्राण घातक हल्ला केला त्यामुळे हिमायतनगर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती त्या घटनेचा जाहीर निषेध म्हणून आज हिमायतनगर शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठित नागरिकांनी शहरातील सर्व बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा जाहीर निषेध करत आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी हिमायतनगर पोलीस प्रशासनांना एका निवेदनाद्वारे केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर शहरात चाकू हल्ल्याची ही दुसरी तिसरी घटना झाल्याने हिमायतनगर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हिमायतनगर शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्षांवर राजकीय पूर्व वैमनसत्यातून हा प्राण घातक हल्ला झाल्यामुळे जिल्ह्यात याची खळबळ उडाली आहे त्यामुळे शहरातील सर्व व्यापारी, जेष्ठ नागरिकांनी व सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आज दिनांक 4 जुलै रोजी स्वयंस्फूर्तीने शहराची बाजारपेठ बंद ठेवून संबंधित भ्याड हल्ल्यातील आरोपीस तात्काळ अटक करून त्यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करावा, व त्यांच्यावर हद्द पारीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा या मागणीचे निवेदन हिमायतनगर पोलीस प्रशासनास देण्यात आले या घटनेमध्ये माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड वर चाकू हल्ला करणाऱ्या आरोळी विरुद्ध दिलेल्या फिर्यादी वरून हिमायतनगर पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता 2023 4/25 भारतीय हत्यार कायद्या नुसार कलम 326,118(2),352(2),151(2),351(3), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर युवा मोर्चा माजी तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर कलम 118(1),351(2),351(3) प्रमाणे हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास हिमायतनगर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शरद जराड हे करीत आहेत.